Skin Care | त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी ‘रेड वाईन’ लाभदायी, वाचा याचे फायदे…

Skin Care | त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी ‘रेड वाईन’ लाभदायी, वाचा याचे फायदे...

रेड वाईन द्राक्षापासून बनवली जाते, ज्यामध्ये रेवॅट्रॉल नावाचा अँटी-ऑक्सिडंट असतो, जो त्वचेवर अँटी-एजंट म्हणून काम करतो.

Harshada Bhirvandekar

|

Jan 27, 2021 | 1:57 PM

मुंबई : रेड वाईन पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे तणाव दूर राहतो आणि मूड चांगला राहतो. आपल्यापैकी बहुतेक लोकांना हे माहित आहे की, रेड वाईन आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. परंतु, हीच रेड वाईन आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे, हे फारच कमी लोकांना माहित आहे (Skin Care Benefits of Red Wine).

रेड वाईन द्राक्षापासून बनवली जाते, ज्यामध्ये रेवॅट्रॉल नावाचा अँटी-ऑक्सिडंट असतो, जो त्वचेवर अँटी-एजंट म्हणून काम करतो. चला तर, त्वचेची काळजी घेण्याच्या उपचारासाठी रेड वाईनचा कसा वापर करता येईल ते जाणून घेऊया…

वृद्धत्व रोखते

रेड वाईनमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात जे आपल्या त्वचेवर अँटी-एजिंग म्हणून कार्य करतात. तसेच ते त्वचेमध्ये कोलेजेन वाढवण्यास देखील मदत करतात. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत.

मुरुम नाहीशी होतात

वाईनमध्ये अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत, जे चेहऱ्यावरील मुरुमं कमी करण्यास मदत करतात. तसेच, त्वचा स्वच्छ करतात.

चमकदार त्वचा

रेड वाईनमध्ये पॉलिफेनॉल हा घटक असतो, जो आपल्या त्वचेची नैसर्गिक चमक वाढवण्याचे काम करतो.

टॅनिंग काढण्यासाठी

यामधील उपयुक्त घटक चेहर्‍यावरील टॅनिंग अगदी सहजपणे काढून टाकतात. अल्कोहोल त्वचेवरील धूळ साफ करण्यासाठी उपयुक्त आहे (Skin Care Benefits of Red Wine).

टोनर

आपण ऑर्गेनिक टोनर म्हणून चेहऱ्यावर वाईनच वापर करू शकता. यासाठी दररोज तुम्ही कापसाचा बोळ्यावर रेड वाईन घेऊन त्याने चेहरा स्वच्छ करू शकता.

क्लीन्सर

2 चमचे वाईन आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित मिसळूनचेहऱ्यावर लावा. यासाठी आपण कापसाच्या बोळ्याचा वापर देखील करू शकता.

मसाज फेस पॅक

वाईनमध्ये आपण 2 चमचे कोरफड जेल मिसळून, त्याने चेहऱ्यावर मसाज करू शकता. तसेच हे मिश्रण फेस मास्क म्हणून देखील लावू शकता. यानंतर हलक्या हातांनी मसाज करा. याने रक्ताभिसरण वाढते.

रेड वाईनचे इतर फायदे :

– रेड वाईनचं सेवन हे पचनशक्तीही मजबूत करतं. मर्यादित प्रमाणात रेड वाईनचं सेवन केल्यास पोटातील बॅक्टेरिया नाश पावतात आणि पोटांचा अल्सरही कमी होतो.

– ब्लड क्लॉटींग म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवरही रेड वाईन गुणकारी आहे. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि पल्मनरी एम्बोलिज्मचा धोकाही कमी होतो.

– नुकत्याच एका शोधात आढळलं आहे की, रेड वाईनच्या सेवनाने स्मरणशक्ती बाबतच्या समस्याचंही निवारण होतं.

– डायबिटीस झालेल्या लोकांसाठी रेड वाईन खूपच फायदेशीर असतं. कारण यामध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin Care Benefits of Red Wine)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें