Skin Care | गर्भावस्थेदरम्यान का निर्माण होते मुरुमांची समस्या, वाचा यावरील उपाय…

गर्भधारणा ही एक अतिशय सुंदर भावना आहे. परंतु यावेळी, हार्मोनल बदलांमुळे महिलांना बर्‍याच शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.

Skin Care | गर्भावस्थेदरम्यान का निर्माण होते मुरुमांची समस्या, वाचा यावरील उपाय...
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 4:16 PM

मुंबई : गर्भधारणा ही एक अतिशय सुंदर भावना आहे. परंतु यावेळी, हार्मोनल बदलांमुळे महिलांना बर्‍याच शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. हार्मोनल बदलांमुळे महिलांना गर्भावस्थे दरम्यान मुरुमांचा त्रास होतो. यापैकी बहुतेक समस्या पहिल्या तिमाहीत उद्भवतात. खरं तर, पहिल्या तिमाहीत शरीरात हार्मोनल बदलांमुळे त्वचा अतिशय तेलकट बनते. तथापि, काही महिलांना या काळात मुरुमांची समस्या उद्भवते. इतकेच नाहीतर, यामुळे इतरही अनेक त्वचेच्या समस्या उद्भवतात (Skin care tips for pimple during pregnancy).

परंतु, जर एखाद्या महिलेस मासिक पाळीच्या आधी मुरुमांचा त्रास झाला असेल किंवा मुरुम येत असतील, तर तिला गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत पुन्हा या समस्येचा त्रास होऊ शकतो. मात्र, जर पहिल्या गर्भावस्थेदरम्यान मुरुमांचा त्रास झाला नाही तर, नंतरच्या वेळी देखील हा त्रास होणार नाही, असे म्हटले जाते. त्याच वेळी, गरोदरपणात मुरुमांच्या समस्येवर उपचार करणे काहीसे जटिल आहे, कारण बहुतेक औषधे आणि अँटी-पिंपल क्रीम गरोदरपणात सुरक्षित मानली जात नाहीत. अशा परिस्थितीत आपण काही नैसर्गिक उपाय ट्राय करू शकता.

‘या’ टिप्स नक्की ट्राय करा.

– मधात अँटी-सेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे मुरुमांच्या समस्येवर प्रभावी उपाय ठरू शकतात. यासाठी मध लावण्यापूर्वी आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. नंतर मुरूम प्रभावित भागावर मध लावा आणि 20 ते 30 मिनिटे ते तसेच राहू द्या. यानंतर साध्या पाण्याने आपला चेहरा धुवा (Skin care tips for pimple during pregnancy).

– बेकिंग सोडा त्वचेतून निघणारे अतिरिक्त तेल शोषून घेतो आणि त्वचेची दुरुस्ती किंवा बरे होण्यास बर्‍याच प्रमाणात मदत करतो. यासाठी बेकिंग सोडाची पेस्ट तयार करा आणि ती मुरुमांवर लावा. ही पेस्ट कोरडी झाल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

– कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आणि बहुतेक वेळा कॉस्मेटिक उत्पादनात देखील याचा वापर केला जातो. कोरफड त्वचेवर येणारी खाज कमी करून, त्वचा कोरडी होण्यापासून रोखतो आणि कोरड्या त्वचेला हायड्रेट करण्याचे कार्य करतो. गरोदरपणात मॉइश्चरायझर म्हणून कोरफडचा वापर करता येतो.

– काकडीचे काही तुकडे आणि एक चमचा ओट्स मील एका भांड्यात मिक्स करा. त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा. आता ही पेस्ट आपल्या मुरुमांवर लावा. 10 ते 20 मिनिटे ही पेस्ट तसीच ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin care tips for pimple during pregnancy)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.