Skin Care Tips : त्वचेचा तेलकटपणा दूर करण्यासाठी घरच्या घरी बनवा फेस पॅक, चेहरा होईल तजेलदार

आपली त्वचा तेलकट असेल तर त्याची अधिक काळजी आपल्याला घ्यावी लागते. तत्वचे वरील तेलावर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता.चला तर मग घरच्या घरी चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करुया.

Skin Care Tips : त्वचेचा तेलकटपणा दूर करण्यासाठी घरच्या घरी बनवा फेस पॅक, चेहरा होईल तजेलदार
face

मुंबई : सुंदर दिसायला कोणाला नको असतं, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतो. मात्र, प्रत्येकाची त्वचा वेगवेगळ्या प्रकारची असते. जर आपली त्वचा तेलकट असेल तर त्याची अधिक काळजी आपल्याला घ्यावी लागते. तत्वचे वरील तेलावर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता.चला तर मग घरच्या घरी चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करुया.

तेलकट त्वचेसाठी बेसन फेस वापरा

बेसन फेस पॅक

एका वाडग्यात २ चमचे बेसन घ्या आणि त्यात आवश्यक प्रमाणात पाणी टाका. मिक्स करून या मिश्रणाची पेस्ट बनवा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. ते 20 ते 25 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. ही संपूर्ण प्रक्रिया दररोज किंवा प्रत्येक एक दिवस आड करा.

मध आणि बेसन

एका वाडग्यात दोन चमचे बेसन घ्या आणि त्यात एक चमचा मध टाका. हे मिश्रण मिक्स करा आणि नंतर थोडे पाणी घालून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि त्वचेवर 20-30 मिनिटे सोडा. नंतर चेहरा पाण्याने धुवा.

लिंबाचा रस आणि बेसन

एका वाडग्यात दोन चमचे बेसन आणि एक चमचा ताज्या लिंबाचा रस घ्या. त्यात थोडे पाणी घाला आणि हे सर्व एकत्र मिसळून फेस पॅक तयार करा. हे सर्व चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 15-20 मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून 3 वेळा हा फेस पॅक वापरू शकतो.

साखर आणि बेसन

एका वाडग्यात एक चमचा साखर आणि बेसन घ्या. ते एकत्र करा आणि नंतर त्यात थोडे गुलाब पाणी घाला. पेस्ट तयार करण्यासाठी सर्वकाही एकत्र करा. ते संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा आणि बोटांनी हलक्या हाताने मालिश करा. हे मिश्रण 2-3 मिनिटांसाठी त्वचेवर ठेवा. त्यानंतर ताज्या थंड पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून दोनदा त्याचा वापर करू शकता.

कोरफड आणि बेसन

दोन चमचे बेसनमध्ये पुरेशा प्रमाणात कोरफड जेल मिसळा. हे सर्व एकत्र करून चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा. काही मिनिटांसाठी ते सोडा. तेलकट त्वचेच्या काळजीसाठी दर दोन दिवसांनी एकदा याचा वापर केला जाऊ शकतो.

इतर बातम्या :

Power Nap | अपुरी झोप शरीरासाठी घातक, महिलांना होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, आताच सावध व्हा!

Healthy Heart Tips | दररोज 5 उपाय करा, हृदयरोग आसपास फिरकणारही नाही!

Weight Loss : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ खास पेय अत्यंत फायदेशीर, वाचा!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI