AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diabetes Care : तुम्हाला मधुमेह आहे?, ‘हे’ 6 घरगुती उपाय नक्की करा…

आजकाल बहुतेक लोक हे मधुमेह ग्रस्त आहेत. या दरम्यान, रक्तातील साखरेची पातळी वाढते.

Diabetes Care : तुम्हाला मधुमेह आहे?, 'हे' 6 घरगुती उपाय नक्की करा...
मधुमेह
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 3:01 PM
Share

मुंबई : आजकाल बहुतेक लोक हे मधुमेह ग्रस्त आहेत. या दरम्यान, रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे शरीरात इन्सुलिनचा अभाव होतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे तुम्ही काही घरगुती उपाय करून रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करू शकता. आहारात नेमके काय घेतले पाहिजे. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहिल हे बघूयात (Special tips for patients with diabetes)

दालचिनी

दालचिनीमध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड असते. हे मधुमेह विरूद्ध आणि प्रतिबंध करण्यास मदत करते. दालचिनीमुळे शरीरातील इन्सुलिन वाढवण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. मधुमेह असलेल्या व्यक्तीने आपल्या आहारात दालचिनीचा समावेश केला पाहिजे. मात्र, दालचिनीचे अधिक सेवन हानिकारक आहे.

कोरफड

कोरफड आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. कोरफड खाण्यासाठी कडू लागत असली तरी देखील शरीरातील साखरेची पातळी संतुलित राखण्यासाठी कोरफड मदत करते. फक्त कोरफड खाणे शक्य नसल्यास आपण ताकामध्ये कोरफडचा गर घालून पिऊ शकतो. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे. त्यांनी आपल्या आहारात दररोज कोरफड घेतली पाहिजे.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी केवळ त्वचेसाठीच नाही तर मधुमेहासाठी देखील उपयुक्त आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज 600 मिलीग्राम व्हिटॅमिन सी घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत होते. ज्या लोकांना तीव्र मधुमेह आहे. त्यांनी आपल्या आहारात दररोज व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले फळे खावीत. संत्री, किवी, मोसंबी, लिंबू आणि आंबा यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते.

व्यायाम

टाईप 2 मधुमेहामागील मुख्य कारणांपैकी एक अधिक वजन आहे. कोणत्याही प्रकारचा व्यायाम हा दररोज केला पाहिजे. योगा, झुम्बा, एरोबिक्स, चालणे, पळणे या सारखे व्यायाम केल्याने शरीरातील साखरेची पातळी सुधारू शकते. इतकेच नाही तर दररोज चालण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे दररोज कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणे आवश्यक आहे.

भरपूर पाणी प्या

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी जास्त पाणी प्यावे, हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जास्त पाणी पिल्याने आपल्या शरीरातील साखरेची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते. शिवाय जास्त पाणी पिल्यामुळे आपण हेल्दी आणि निरोगी राहतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Special tips for patients with diabetes)

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा