AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : लठ्ठपणा कमी करायचाय? मग रात्री ‘या’ वेळेला जेवन करा

आज प्रत्येकजण लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो.

Weight Loss : लठ्ठपणा कमी करायचाय? मग रात्री 'या' वेळेला जेवन करा
उन्हाळ्यात झपाट्याने कमी होईल आपले वजन, फक्त या 5 गोष्टी करा सेवन
| Updated on: Mar 21, 2021 | 9:47 AM
Share

मुंबई : आज प्रत्येकजण लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो. बरेच लोक लठ्ठपणा कमी करण्याासाठी औषधांचा अवलंब देखील करतात. तरी देखील वजन कमी होत नाही. जर तुम्ही पण लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर प्रथम लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला जेवनाच्या वेळा बदलाव्या लागतील. कारण जेवनाच्या वेळा बरोबर नसतील तर वजन वाढण्याचे ते एक प्रमुख कारण असते. विशेषत: रात्रीच्या जेवनाची वेळ पाळली पाहिजे. (Special tips for weight loss)

रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि सौम्य, पचन करणे सोपे आणि कमी कॅलरी युक्त असावे. रात्रीच्या जेवणातील जड पदार्थ आपल्याला बर्‍याचदा अस्वस्थ करतात आणि आपल्या झोपेत अडथळा आणू शकतात. यामुळे जठरासंबंधी समस्या देखील वाढवू शकतात. रात्रीचे जेवण कसे असावे आणि त्यात कोणत्या गोष्टी खाव्यात किंवा कोणते पदार्थ खाऊ नयेत, याचा आपण विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.आहार तज्ज्ञांच्या मते, आपण झोपण्याच्या वेळच्या तीन तास आधी रात्रीचे जेवण घेतले पाहिजे.

रात्रीचे जेवण आणि झोपेच्या दरम्यान आपण पुरेसे अंतर राखले पाहिजे, हे खूप महत्वाचे आहे. जर आपण नियमितपणे त्याचे अनुसरण केले तर आपल्याला कधीही आपला रात्रीचे जेवण वगळण्याची आवश्यकता नाही वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे चुकीचा आहार टाळणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. भाजीपाल्यांचं सलाड खाणं हे शरिरासाठी आरोग्यदायी आहे. त्याचा वजन कमी करण्यासाठी देखील उपयोग होतो.

जास्त प्रमाणात सलाड खाल्ले तर तुम्ही विचार करता त्यापेक्षा अधिक कॅलरी शरिरात जातात. सिजरसाठी (Caesar) वापरल्या जाणाऱ्या क्रिम सलाडमध्ये 20 ग्रॅम पर्यंत फॅट असतात, तर जवळपास 200 च्या आसपास कॅलरीज असतात. अनेक लोक त्यांच्या आहारात सॉस आणि ग्रेव्हीचा उपयोग करतात. मात्र, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आणि कॅलरिज असतात.थेट फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे.

मात्र, फळांचा उपयोग करुन बनवलेले अनेक पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असतात. उदाहरणार्थ बनाना ब्रेड. बनाना ब्रेडमध्ये बनाना फ्लेवर असतो. शिवाय मोठ्या प्रमाणात साखर, फॅट्स आणि कॅलरिज देखील असतात. हे पदार्थ खूप प्रक्रिया केलेले असतात. त्यामुळे ते आरोग्याला धोकाही पोहचवू शकतात. फळांच्या कृत्रिम पेयांमध्ये केवळ 30 टक्के रस असतो. मात्र, साखरेचं प्रमाण मोठं असतं. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही पेय टाळा. शिवाय जेवण करताना सावकाश व्यवस्थित चावून खाणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे अधिक प्रमाणातील खाणं टाळलं जाईल आणि वजन नियंत्रित राहिल.

संबंधित बातम्या : 

(Special tips for weight loss)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.