कोरोनाची दुसरी लाट आणि पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवाल?; वाचा खास टिप्स

कोरोनाची दुसरी लाट आणि पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवाल?; वाचा खास टिप्स
निरोगी आहार

सध्याच्या कोरोना काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 28, 2021 | 5:01 PM

मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपण कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहू शकतो. या काळात आहारात असा पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. पावसाळा आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रोगप्रतिकारशक्ती चांगली कसे ठेवाल? जाणून घ्या यासाठी काही खास टिप्स. (Special tips to boost the immune system in the corona and the rain)

-सकाळी लवकर उठणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर असते. सकाळी उठून आपण योग-श्वासाचा व्यायाम केला पाहिजे.

-चालणे आपल्या आरोग्यासाठी हे खूप चांगले असते. मात्र, दररोज कमीतकमी 45 मिनिटांसाठी तरी आपण चालले पाहिजे.

-या सध्याच्या कोरोना काळात आपण निरोगी अन्नाचे सेवन केले पाहिजे. शक्यतो मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळाच

-कोरोनापासून दूर राहिचे असेल तर बाहेरचे जेवण टाळावे. घरी तयार केलेला हेल्दी आणि सकस आहार आपण घेतला पाहिजे.

-सर्वांनाच माहिती आहे की, ड्राय फ्रूट्सचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे दररोज सकाळी बदाम, अक्रोड सारख्या ड्राय फ्रूट्सचे सेवन करावे.

-रात्री उशीरा जेवल्याने आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. यासाठी आपण रात्रीचे जेवन सायंकाळी साडे सहा ते सातच्या आतमध्ये केले पाहिजे.

-लाॅकडाऊन असल्यामुळे बरेच लोक रात्री उशीरापर्यंत जागतात. मात्र, असे न करता आपण रात्री लवकर झोपले पाहिजे.

-कोरोनामुळे सध्या मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर बाळगणे अतिरिक्त फायद्याचे आहे. शक्यतो घराच्या बाहेर जाणे टाळा. मात्र, घराच्या बाहेर निघताना मास्कचा वापर केला पाहिजे.

-हळदीचे दूध हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी आपण आहारात हळदीच्या दुधाचा समावेश केला पाहिजे. हळदीचं दूध म्हणजे स्वतःमध्येच एक औषध आहे.

(वरील लेख डॉ. सचिन जैन, कन्सल्टंट, चेस्ट फिजिशियन & ब्रॉंकोस्कोपीस्ट, मसीना हॉस्पिटल यांनी लिहिला आहे)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Special tips to boost the immune system in the corona and the rain)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें