AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

COVID 19 | कोरोनापासून बचावासाठी योग्यप्रकारे वाफ घेताय का? जाणून घ्या Steam Inhalation संदर्भातील आवश्यक माहिती…

कोरोना दिवसेंदिवस गंभीर आणि अधिक प्राणघातक होत चालला आहे आणि प्रत्येक वेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी सरकार खबरदारीचे उपाय आणि सूचना जारी करीत आहे. या सर्वांमध्ये, ‘स्टीम इनहेलेशन’ (Steam Inhalation) म्हणजेच वाफ घेणे महत्त्वाचे आहे.

COVID 19 | कोरोनापासून बचावासाठी योग्यप्रकारे वाफ घेताय का? जाणून घ्या Steam Inhalation संदर्भातील आवश्यक माहिती...
वाफ घेण्याची प्रक्रिया
| Updated on: Apr 24, 2021 | 11:43 AM
Share

मुंबई : कोरोना दिवसेंदिवस गंभीर आणि अधिक प्राणघातक होत चालला आहे आणि प्रत्येक वेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी सरकार खबरदारीचे उपाय आणि सूचना जारी करीत आहे. या सर्वांमध्ये, ‘स्टीम इनहेलेशन’ (Steam Inhalation) म्हणजेच वाफ घेणे महत्त्वाचे आहे. डॉक्टर देखील रुग्णाला नियमितपणे वाफ घेण्याची शिफारस करतात. अनेक अभ्यासानुसार स्टीम इनहेलेशनमुळे कोरोनाचे परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते. बर्‍याच लोकांनी हा दावा फेटाळला आहे. तथापि, डॉक्टर अजूनही याची ‘उपाय’ म्हणून शिफारस करत आहेत (Steam Inhalation keep these things in mind while taking steam to prevent corona).

मात्र, बर्‍याच लोकांना योग्यरित्या स्टीम कसे घ्यावे हे माहित नसते. या दरम्यान भारत आणि परदेशात बरीच स्टीम घेताना अपघाताची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात ज्यात केवळ लहान मुलेच नव्हे तर मोठी माणसं देखील भाजली आहेत. म्हणून, स्टीम घेताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. चला तर, स्टीमिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया…

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

  1. गरम पाणी लहान मुलांपासून लांब ठेवा.
  2. गरम पाणी भांड्यात काठोकाठ भरलेले नाही, याची खात्री करुन घ्या.
  3. कोणताही दुर्घटना टाळण्यासाठी आपल्या मांडीवर टॉवेल ठेवून बसा.
  4. दिवसांतून दोनवेळापेक्षा जास्त स्टीम घेऊ नका, अन्यथा त्याचा तुमच्या चेहर्‍यावर आणि मानेवर परिणाम होईल.
  5. स्टीम घेताना तुमचे डोळे बंद आहेत हे सुनिश्चित करा.
  6. कमीतकमी पाच मिनिटांपर्यंत हळू हळू आणि खोलवर वाफ घ्या (Steam Inhalation keep these things in mind while taking steam to prevent corona).

वाफ घेण्याने कोरोनापासून मुक्ती मिळण्यात मदत होते?

स्टीम इनहेलेशनमुळे कोरोना विषाणूचा परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते. परंतु याने प्राणघातक विषाणूतून पूर्णपणे बरे होऊ शकत नाही. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) किंवा जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना टाळण्यासाठी स्टीम इनहेलेशनची शिफारस केलेली नाही.

कोरोनापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी, नियमितपणे हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी अंतर ठेवणे आणि आवश्यकतेनुसार सॅनिटायझर वापरणे हे उत्तम मार्ग आहेत.

कोरोना विषाणूच्या या काळात, स्वतःचे रक्षण करणे फार महत्वाचे झाले आहे. त्याच्या प्रभावी उपचारांशिवाय आपल्याला स्वतःवर संयम ठेवून काम करावे लागेल आणि आपले मन संतुलित ठेवून त्याचे निदान करावे लागेल. लक्षात ठेवा की, कोरोना विषाणू आपल्या मनातून बाहेर येत नसेल, तर तो शरीरातून बाहेर पडण्यासाठीदेखील बराच काळ लागू शकतो. अशा परिस्थितीत, स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही पावले उचलणे चांगले आहे, मात्र, कोरोना विषाणूला आपल्या मनावर अधिराज्य गाजवू देऊ नका.

(Steam Inhalation keep these things in mind while taking steam to prevent corona)

हेही वाचा :

Health Tips | कोरोना काळात घरीच राहून इम्युनिटी वाढवायचीय? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!

Ajwain Tea Benefits | ‘ओव्या’चा चहा प्यायल्याने शरीराला होतील अनेक फायदे, वाचा कसा बनवला जातो ‘हा’ चहा…

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.