पुण्यातील सर्वात स्वस्त शॉपिंग मार्केट, जिथे तुम्हाला मिळतील ट्रेंडी कपडे
Street Shopping in Pune : मुलींसाठी शॉपिंग म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असतो... प्रत्येक कार्यक्रमात मुलींना नवीन कपडे हवे असतात. अशात स्वस्त आणि ट्रेंडी कपड्यांसाठी पुण्यातील काही महत्त्वाची ठिकणे माहिती करुन घ्या...

Street Shopping in Pune : अनेकांना मॉल आणि मोठ्या दुकानांमध्ये शॉपिंग करायला आवडत नाही. कारण त्यात काही आनंद मिळत नाही. खरी शॉपिंगची मजा तर, स्ट्रिट शॉपिंगमध्ये आहे. मुंबईत तर, अनेक शॉपिंगसाठी स्वस्त ठिकाण आहे. पण पुणे देखील यामध्ये मागे नाही, पुण्यात देखील असे अनेक मार्केट आहे जेथे तुम्ही स्वस्त पण ट्रेंडी कपडे खरेदी करु शकता… ट्रेंडी टी-शर्ट्स, ड्रेस, जीन्स, बॅग्ज, शूज आणि अॅक्सेसरीजसाठी काही ठिकाण प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे… तर जाणून ध्या त्या ठिकाणांबद्दल..
फॅशन स्ट्रीट (Shion Street Pune): पुण्यातील सर्वात प्रसिद्ध शॉपिंगचं ठिकाण म्हणजे फॅशन स्ट्रीट… याठिकाणी अनेक प्रकारचे कपडे स्वस्त दरात तुम्हाला मिळतील… पुण्याच्या कॅम्पमध्ये हे मार्केट कॉलेज विद्यार्थी आणि शॉपरसाठी आवडतं ठिकाण आहे. हजारो स्टॉल्समध्ये ट्रेंडी टी-शर्ट्स, ड्रेस, जीन्स, बॅग्ज, शूज आणि अॅक्सेसरीज अगदी कमी किमतीत मिळतात. फक्त मार्केटमध्ये तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे…
तुळशी बाग (Tulsi Baug) : या मार्केटमध्ये तुम्हाला पारंपारिक आणि ट्रेंडी स्टाईलचे कपडे खरेदी करता येतील… पुण्याच्या केंद्रातले हे जुने पण मनमोहक मार्केट आहे. येथे विविध प्रकारचे रेडी-मेड कपडे, जीन्स, शर्ट्स, स्लीक्स आणि अॅक्सेसरीज़ मिळतात. पारंपारिक आणि आधुनिक स्टाईल दोन्ही सापडतात.
लक्ष्मी रोड मार्केट (Laxmi Road Market) : या एकाच मर्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे कपडे आणि अॅक्सेसरीज मिळतील. त्यामुळे दुसऱ्या मार्केटमध्ये जाण्याची तुम्हाला गरजच भासणार नाही.. हा पुण्यातला सर्वात प्रसिद्ध आणि किफायतशीर मार्केट आहे. पारंपारिक भारतीय कपड्यांपासून ते कॅज्युअल वेस्टर्न कपड्यांपर्यंत सर्व काही येथे स्वस्तात मिळू शकतं.
फर्ग्युसन कॉलेज रोड (Fergusson College Road ) : एफसी रोड हे पुण्यातील खरेदीसाठी सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण आहे. युवा वर्ग आणि कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये हा बाजार खूप लोकप्रिय आहे. फॅशन आउटफिट, टी-शर्ट्स, पँट्स, बॅग्ज आणि अॅक्सेसरीज़ बजेटमध्ये मिळतात.
हाँगकाँग लेन (Hong Kong Lane) – या लेनमध्ये ट्रेंडी कपडे, बॅग्ज, सनग्लासेस, बेल्ट आणि इतर फॅशन अॅक्सेसरीज सहज स्वस्तात मिळतात. हा मार्केट स्ट्रीट-स्टाइल शॉपिंगसाठी चांगला पर्याय आहे.
जुना बाजार (Juna Bazar) : प्राचीन, खास प्राचीन वस्तू गोळा करण्याचा छंद असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. जर तुम्हाला थ्रिफ्ट किंवा विंटेज कपडे, अनोख्या टॉप्स किंवा स्टाईलिश युनिक पीसेस हवे असतील तर जूना बाजार हे उत्तम ठिकाण आहे. विशेषतः जुन्या किंवा सेकंड-हँड फॅशन ऑब्जेक्टसाठी हे मार्केट खास आहे.
