AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine Day : धर्माच्या सीमा ओलांडत लग्नगाठ बांधली, रसिका आणि आसिफचा आंतरधर्मीय प्रेम विवाह पुन्हा चर्चेत

कधीकाळी संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या नाशिकमधील एक विवाह पुन्हा एकदा दीड वर्षांनी व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने चर्चेत आली आहे.

Valentine Day : धर्माच्या सीमा ओलांडत लग्नगाठ बांधली, रसिका आणि आसिफचा आंतरधर्मीय प्रेम विवाह पुन्हा चर्चेत
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 13, 2023 | 10:59 AM
Share

नाशिक : काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ( Social Media ) एक लग्नपत्रिका व्हायरल झाली होती. त्यामध्ये लिहिलं होतं रसिका ( Rasika ) आडगावकर आणि आसिफ ( Asif )  खान. त्यामुळे या विवाहाला धार्मिक रंग देऊन लग्न मोडण्यासाठी कट्टरवादी लोकांनी यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय झाला होता. यामधील विशेष बाब म्हणजे दोन्ही समाजातील कट्टरवादी लोकांनी या लग्नाला विरोध करूनही दोन्ही मुला-मुलीकडील कुटुंबं त्यांच्यासोबत होते. त्यामुळे लग्न होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, विरोध पाहता लग्न होणार की नाही अशी सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली होती.

पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. असं असलं तरी आजही आंतरधर्मीय असो नाहीतर आंतरजातीय विवाह असो त्याला अनेक ठिकाणी विरोध केला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना सुद्धा घडतात.

आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह केल्यानंतर समाज काय म्हणेल, नातेवाईकांमध्ये काय चर्चा होईल अशा भीतीपोटी अनेक विवाह होत नाही पण याच भिंती तोडून दीड वर्षापूर्वी आसिफ आणि रसिकाचा विवाह पार पडला होता.

विशेष म्हणजे संपूर्ण ठिकाणाहून विरोध होत असतांना तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांनी आसिफ आणि रसिकाची भेट घेतली होती. त्यानंतर हा विवाह निर्विघ्नपणे पार पडला होता. आज त्यांच्या लग्नाला जवळपास दीड वर्षे पूर्ण झाले आहे.

आसिफ आणि रसिका यांची खरंतर ओळख महाविद्यालयात झाली होती. त्यांची चांगली मैत्री झाल्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर दोघांनीही आपल्या घरी याबाबत माहिती देऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

दोन्ही कुटुंबाकडून संमती मिळाल्यानंतर लग्न सोहळा पार पडत होता. मात्र, नातेवाइकांनीच लग्नपत्रिका व्हायरल करत लग्न मोडण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर कट्टरवादी लोकांनी यामध्ये उडी घेत लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, आज दीड वर्षे झाले असून रसिका आणि आसिफ यांचा सुखाने संसार सुरू असल्याचे सांगत आहे. आम्ही लग्न करतांना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला होता असे सांगत असतांना त्यांना आजही तो विरोध डोळ्यासमोर येत आहे.

आसिफ आणि रसिका यांच्या प्रेमाची चर्चा सध्या सुरू असलेल्या व्हॅलेंटाईन विकमध्ये चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा, त्यामध्ये झालेला विरोध आणि आता सुखी असलेल्या संसाराची चर्चा होऊ लागली आहे.

Follow Us
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर