भारतातील या 4 जागी सूर्यास्ताचा नजारा दिसतो एकदम भारी, वारंवार भेट देतात पर्यटक
अनेक रम्य पर्यटन स्थळं सुर्यादय (Sun Rise) आणि सूर्यास्त (Sunset) यासाठी प्रसिद्ध असतात. येथील सुर्यादयाची लाली आणि सुर्यास्ताची सोनेरी उन्हे पाहिल्याने डोळ्यांचे प्रारणे फिटते....

भारतात हिवाळा नयनरम्य सूर्यास्त पाहाण्यासाठी सर्वात चांगले हवामान मानले जाते. कारण या हवामानात आकाश स्वच्छ असते. हवेत थंडावा असतो.त्यामुळे आकारातील रंगांची उधळन मन मोहून टाकते. जर तुम्हाला फिरायची सवय असेल तर सनसेटचा नजारा पाहायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण भारतातील अशा चार ठिकाणांची माहिती घेणार आहोत. जेथे सुर्यास्ताचा नजारा खूपच सुंदर दिसतो. हा नजरा इतका सुंदर असतो की पर्यटक येथे खास आवर्जून जातात.
1. कच्छचे रण, गुजरात –
थंडीत गुजरात येथील कच्छचे रण पाहण्यासारखे असते. थंडीच्या दिवसातील सायंकाळी येथे थांबून सूर्यास्त पाहण्यासाठी लोक खूप आवर्जून येतात. येथील रण उत्सवा दरम्यानचा येथील अनुभव आणखी खास होऊन जातो. त्यावेळी येथे लोक संगीत, पारंपारिक डान्स, हस्तशिल्प, ऊंट सफारी आणि स्थानिक पदार्थांचा आनंद घेता येतो.
2. वर्कला क्लिफ, केरळ –
वर्कला येथील उंच डोंगरांवरुन अरबी समुद्राचा नजारा आणखीन चांगला दिसतो. थंडीतील हवामान एकदम स्वच्छ असते. जेथे समुद्रातून सुर्य मावळताचे दृश्य विलोभनीय नजरेस येते. जसजसा सुर्य पाण्यात तसतसा आकाशाचा रंग बदलत जातो. आणि वातावरण आल्हाददायक आणि मनमोहक होते.सनसेटचा नजारा पाहण्यासाठी तुम्ही डोंगराच्या कडेवरील कॅफेत बसून आनंद घेऊ शकतो.
3. थार वाळवंट, राजस्थान
थंडीच्या हवामानात थार वाळवंटातील सुर्यास्त खूपच सुंदर दिसतो.कारण येथील हवामान यावेळी खूपच सुंदर होते. जस-जसा सुर्य रेतीच्या टेकड्यांच्या पाठी जातो, तसा वाळू सोनेरी लाल रंगात दिसते. हा नजारा खूपच शांत आणि मनाला सुख देणारा असतो. सनसेट पाहाण्यासाठी अनेकजण येथे जात असतात.
4. सनसेट पॉईंट, माऊंट आबू, राजस्थान
माऊंट आबू, राजस्थानातील एकमेव हिल स्टेशन असून ते त्याच्या सुंदर नजाऱ्यांसाठी ओळखले जाते. येथील अरवली पर्वतांचा सनसेट पॉईंट खूप प्रसिद्ध आहेत.थंडीतील सायंकाळ येथे सुर्य हळूहळू येथील डोंगर रांगाच्या पलिकडे जाताना सुंदर दिसतो. आकाशाचा रंग नारंगी आणि निळसर जांभळा दिसतो, जो पाहायला फारच मनमोहक वाटतो.
