दररोज दही खाण्याचे होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या याबद्दल अधिक

आपल्या देशात कोणत्याही कामापूर्वी गोड दही खाणे शुभ मानले जाते. दही अनेक प्रकारे सेवन केले जाते.

दररोज दही खाण्याचे होतात 'हे' 5 फायदे, जाणून घ्या याबद्दल अधिक
दही

मुंबई : आपल्या देशात कोणत्याही कामापूर्वी गोड दही खाणे शुभ मानले जाते. दही अनेक प्रकारे सेवन केले जाते. दही पराठे, रायता आणि ताक देखील आपण खाऊ शकतात. दहीमध्ये बरेच पोषक असतात, जे आपल्याला निरोगी ठेवतात. यासह दही आपल्याला पोटाबरोबरच इतरही अनेक आजार दूर ठेवते. चला दही खाण्याचे फायदे काय ते जाणून घेऊया. (There are 5 benefits to eating Curd every day)

-दहीमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर असतात. यामुळे आपले दात आणि हाडे मजबूत होतात. तसेच दही संधिवात प्रतिबंधित करते. म्हणून दररोज दहीचे सेवन करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे दात व हाडे मजबूत राहतील.

-दही हा एक उत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे. त्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. दही अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे.

-केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे.

-दहीमध्ये लैक्टोज असते. यामुळे तुमची पाचकशक्ती वाढते. ज्यांचे पचन तंत्र कमकुवत आहे अशा लोकांसाठी ते फायदेशीर आहे, कारण दही पचणे खूप सोपे आहे.

-दररोज दहीचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि उच्च रक्तदाब कमी होण्याचा धोका देखील कमी होतो. दही आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवते. हे तुमचे हृदय निरोगी ठेवते.

-दहीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी -2, बी -12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दहीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते जे कॉर्टिसॉल कमी करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. दहीचे सेवन केल्यावर बऱ्याच वेळ पोट भरल्या सारखे वाटते.

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(There are 5 benefits to eating Curd every day)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI