बनारसला जाताय तर ‘या’ पाच चूका अजिबात करू नका, नाहीतर फिरण्याची मजा होईल खराब
बनारस हे शहर फिरण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातुन लोकं येत असतात. कारण हे ठिकाण फक्त भेट देण्याचे ठिकाण नाही तर ते असे ठिकाण आहे जिथे एखाद्याला पुर्ण आध्यात्मिक शांती मिळते. गंगा घाट, महादेवाचे दर्शन आणि येथील गल्ल्या हे सर्व पर्यटकांना आकर्षित करतात आणि त्यांना येथेच राहावेसे वाटते. त्यामुळे अनेकजण बनारस शहर एक्सप्लोर करण्यासाठी जात असतात. मात्र या ठिकाणी जात असताना तुम्ही काही चुका टाळणे महत्वाचे आहे. अन्यथा तुमच्या बनारस सहलीची मजा खराब होऊ शकते. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊयात कोणत्या चुका टाळ्या पाहिजेत.

बनारस, वाराणसी, काशी काहीही म्हणा पण या शहराला आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी असे हे शहर आहे. काशी, वाराणसी या नावांनी ओळखले जाणारे बनारस हे देशातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. तर या ठिकाणी बहुतेकजण हे श्री काशी विश्वनाथांच्या दर्शनासाठी येतात. तसेच या शहराला वेगळया परिचयाची गरज नाहीये, कारण बनारस शहराचा उल्लेख आपण अनेक हिंदी चित्रपट आणि गाण्यांच्या माध्यमातुन ऐकलाच असेल. तसेच बनारस हे गंगा घाटांसाठी प्रसिद्ध आहे आणि गंगा आरती हा एक मंत्रमुग्ध करणारा सुंदर काळ आहे. अध्यात्माव्यतिरिक्त, हे शहर त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा, हस्तकला आणि मलाययो, कचोरी, बनारसी पान यासारख्या स्वादिष्ट पदार्थांसाठी देखील ओळखले जाते. येथील वळणदार गल्ल्यांमध्ये असलेल्या मंदिरांना भेट देण्याची देखील एक वेगळीच मजा आहे, परंतु जर तुम्ही बनारसला जात असाल तर या काही चुका तुमची फिरण्याची मजा खराब करू शकतात.
आजच्या मॉर्डनाइजेशन काळात देखील बनारसचे जुने आकर्षण अबाधित आहे. परदेशी पर्यटक देखील येथे मोठया संख्येने येत असतात आणि भारताच्या रंगांमध्ये बुडून जातात. बनारसमध्ये काय एक्सप्लोर केले पाहिजे हे तुम्हाला सर्वत्र कळेल, परंतु या लेखात तुम्हाला बनारसला भेट देताना कोणत्या चुका करू नयेत हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…
गंगा आरतीसाठी बोटमध्ये बसू नका
वाराणसीमध्ये संध्याकाळी गंगा आरती होते तेव्हा सर्वात सुंदर वेळ असते. बरेच लोकं समोरून आरती पाहण्यासाठी बोटमध्ये बसतात, पण ही चूक तुम्ही करू नका. तुम्हाला येथे खूप गर्दी आणि आवाज जाणवेल आणि बऱ्याचदा बोटवाले जास्त पैसे आकारण्यासाठी गंगा आरती पाहण्यासाठी जागा बंद करतात. म्हणून जर तुम्हाला गंगा आरती पहायची असेल, तर दशाश्वमेध घाटावर आधीच योग्य जागा शोधा.
गोदौलिया चौकाजवळ हॉटेल खरेदी करू नका
तुम्ही जर बनारसला जात असाल तर गोदौलिया चौकाजवळ हॉटेल बुक करू नका, कारण हे बनारसच्या सर्वात गजबजलेल्या भागांपैकी एक आहे, जिथे तुम्हाला सर्वत्र गर्दी आणि आवाज दिसेल, ज्यामुळे तुमची शांतता मिळणार नाही. त्यात हे ठिकाण खूप महाग देखील आहे.
वाराणसीमध्ये चारचाकी वाहनातून प्रवास करू नका
तुम्हाला जर खऱ्या बनारसचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अरुंद, वळणदार गल्ल्यांना भेट दिली पाहिजे, अन्यथा प्रवास अपूर्ण राहील, म्हणून जर तुम्ही तुमच्या चारचाकी वाहनाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही चूक करू नका, त्याऐवजी ई-रिक्षाने प्रवास करा.
मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्याची चूक
तुम्ही बनारसला गेलात तर मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्याची चूक करू नका. जर तुम्हाला येथील स्थानिक जेवणांचा खास करून आस्वाद घ्या आणि ते किफायतशीरही असेल. येथे कचोरीसाठी राम भंडार, मलायसाठी श्रीजी स्वीट्स, लक्ष्मी चायवाला, ब्लू लस्सी शॉप, बाबा विश्वनाथ चाट भंडार, गोवर्धन दास मलायवाला अशी अनेक जुनी दुकाने आहेत.
घाईघाईने फिरणे
बनारसला नेहमी फुरसतीने फिरायला जाण्याचा प्लॅन करा. जर तुम्ही इथे येत असाल तर घाईघाईने फिरण्याची चूक करू नका, अन्यथा तुम्ही बनारस फिरण्याचा पूर्णपणे आनंद घेऊ शकणार नाही. बनारसच्या घाटांवर खूप फोटो किंवा व्हिडिओ क्लिक करण्याऐवजी, येथे एका कोपऱ्यात शांतपणे बसा आणि हे शहर अनुभवा. जर तुम्ही येथे वेगवेगळ्या घाटांवर थांबून वेळ घालवला तर तुमची सहल अद्भुत होईल.
