झटपट वजन कमी करण्यासाठी हे 5 लोकप्रिय डाएट आहेत उत्तम
वजन कमी करण्याची पहिली स्टेप म्हणजे आहारावर नियंत्रण ठेवणे. याचा अर्थ अन्न पूर्णपणे टाळणे असा नाही तर आरोग्यदायी आहार घेणे आणि अनहेल्दी पदार्थांचे सेवन टाळणे असा आहे.चला तर मग आजच्या लेखात आपण झटपट वजन कमी करण्याचे 5 सोपे मार्ग जाणून घेऊयात.

वजन कमी करणे ही एक हळू प्रक्रिया आहे ज्यासाठी सातत्य आवश्यक असते, म्हणजेच तुम्ही तुमच्या आहारापासून ते व्यायामापर्यंत प्रत्येक गोष्टीचे पालन केले पाहिजे. लोकांना अनेकदा दीर्घकाळ नियमांचे पालन करणे अवघड जाते आणि त्यांच्यात संयमाचा अभाव असतो, ज्यामुळे झटपट वजन कमी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. सोशल मीडियावरही अनेक उपाय सांगितले जातात, ज्यांचे लोक अनेकदा पालन करतात. कधीकधी, हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. झटपट वजन कमी करण्यासाठी तयार केलेले अनेक लोकप्रिय वेट लॉस डाएट्स आहेत.
मात्र कोणताही आहार सुरू करण्यापूर्वी, त्याबद्दल योग्य माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी त्याबद्दल वाचणे हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि तज्ञाचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. चला तर मग, झपाट्याने वजन कमी करण्यासाठी कोणते आहार सर्वात लोकप्रिय आहेत ते पाहूया.
इंटरमिटंट फास्टिंग
झटपट वजन कमी करण्यासाठीच्या सर्वात लोकप्रिय आहाराबद्दल बोलायचे झाल्यास बहुतेक लोक इंटरमिटंट फास्टिंग (Intermittent Fasting) करतात. ही खाण्याची एक अशी पद्धत आहे, ज्यामध्ये केव्हा खायचे आणि केव्हा नाही हे ठरवले जाते. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये 16 तास फास्टिंग केले जाते आणि त्यानंतर 8 तासात योग्य आहाराचे सेवन करतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार खाण्याची आणि उपवासाची वेळ निवडू शकता. जसे की 24 तासांत तुम्ही सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत खाऊ शकता आणि उर्वरित वेळ फास्टिंग करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या रोजच्या कामाच्या रूटिंगमधून योग्य वेळ निवडू शकता. सुरुवातीला इंटरमिटंट फास्टिंग करताना थोडे कमी ठेवा.
लो कार्ब्स डाएट
या डाएटमध्ये साखर, पास्ता, रिफाइन्ड पिठापासून बनवलेला ब्रेड, भात, बटाटे, मका किंवा कोणताही स्टार्चयुक्त पदार्थ यांसारखे साधे कर्बोदके पूर्णपणे वगळले जातात. याव्यतिरिक्त आहारात प्रथिने, चांगले फॅट्स आणि जीवनसत्त्वे व खनिजे यांनी समृद्ध पदार्थांचा समावेश केला जातो. अंडी, मांस, मासे, हिरव्या पालेभाज्या, बिया, सुकामेवा आणि ऑलिव्ह ऑइलसारख्या आरोग्यदायी फॅट्सचे सेवन केले जातात. सुरुवातीला यामुळे मानसिक ताण वाढू शकतो, म्हणून तज्ञांचा सल्ला घेणे आणि योग्य आहार तक्ता तयार करणे महत्त्वाचे आहे.
ओएमएडी डाएट
वजन कमी करण्यासाठीच्या ओएमएडी (OMAD) डाएटबद्दल बोलायचे झाल्यास हा डाएट इंटरमिटंट फास्टिंगचाच (intermittent fasting) एक प्रकार आहे. ओएमएडी म्हणजे ‘वन मील अ डे’ (One Meal a Day), म्हणजेच दिवसातून फक्त एकदाच जेवणे. तुम्हाला जेवण्यासाठी एक वेळ ठरवली जाते ज्यात तुम्ही संपुर्ण दिवसातून एकदाच आहाराचे सेवन करू शकता. म्हणजेच अंदाजे 23 तासांचा फास्टिंग होतो. यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते. या डाएटमुळे अशक्तपणा येऊ शकतो. तुम्ही याचे पालन करत असलात तरी तुमच्या जेवणात अशा पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा जे पुरेसे पोषक तत्वे पुरवतात.
केटो डाएट
झटपट वजन कमी करण्यासाठी केटो डाएट देखील खूप लोकप्रिय आहे. यामध्ये कर्बोदके कार्ब्स मोठ्या प्रमाणात कमी केली जातात आणि चांगले फॅट वाढवले जातात. केटो डाएटमध्ये मूलतः कमी कर्बोदके आणि चांगले फॅट हा नियम पाळला जातो. जेव्हा तुम्ही कर्बोदकांच सेवन खूप कमी करता तेव्हा शरीरातील फॅटचे ऊर्जेमध्ये रूपांतर होते ज्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. सामान्यतः, केटो डाएटमध्ये समाविष्ट असलेल्या पदार्थांमध्ये 50 ते 70 टक्के फॅट, मध्यम प्रमाणात प्रथिने आणि केवळ 5 ते 10 टक्के कर्बोदके असतात.
व्हीएलसीडी (VLCD) डाएट
व्हीएलसीडी किंवा व्हेरी लो-कॅलरी डाएट हे नावाप्रमाणेच कॅलरीजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करणारा आहार आहे. यामुळेच वेगाने वजन कमी होते. या आहारात तुमचे दैनंदिन सेवन 800 ते 1000 कॅलरीजपर्यंत मर्यादित ठेवले जाते. त्यामुळे तुम्ही याचे पालन केवळ तज्ञांच्या देखरेखीखालीच केले पाहिजे, कारण यामुळे तीव्र अशक्तपणा येऊ शकतो. हा आहार प्रामुख्याने जास्त वजन असलेल्या लोकांकडून पाळला जातो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
