AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या देशांमध्ये हृदयविकाराचा धोका सर्वाधिक, जाणून घ्या काय आहे कारण

heart attack : हृदय विकाराचे प्रमाण जागतिक स्तरावर वाढत आहे. हृदयविकार होण्याची कारणे देखील लक्षात घेतली पाहिजे. चुकीची जीवनशैली, तणाव आणि चुकीचा आहार यामुळे हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोणत्या भागात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे जाणून घ्या.

या देशांमध्ये हृदयविकाराचा धोका सर्वाधिक, जाणून घ्या काय आहे कारण
heart attack
| Updated on: Dec 12, 2023 | 6:12 PM
Share

Heart Disease : हृदयविकाराच्या झटक्यामुळे जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी लाखो लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू होतो. एका अभ्यासानुसार, भारतात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंमध्ये २०२२ या वर्षातच १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आजाराचा धोका वर्षानुवर्षे वाढत आहे.

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, हृदयविकाराची वेगवेगळी कारणे असू शकतात. बदलती जीवनशैली, तणाव आणि चुकीचा आहार यामुळे हृदयविकाराचा धोका वाढला आहे. कोरोना सारख्या महामारीनंतर ही हदयविकाराचा धोका वाढला आहे. कोणत्याही वयात हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढत आहे.

शास्त्रज्ञांनी जगातील काही भागांमध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूच्या धोक्याबाबत सतर्क केले आहे. आशिया, युरोप, आफ्रिका आणि मध्य पूर्व या देशांमध्ये हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा सर्वाधिक धोका असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. यामागची कारणे काय आहेत जाणून घेऊयात.

हृदयविकार वाढण्याचे कारण

संशोधकांनी वेगवेगळ्या भागाचे विश्लेषण केले आहे. हृदयरोगाशी संबंधित मृत्यू 1990 मध्ये 12.4 दशलक्ष होते जे 2022 मध्ये 19.8 दशलक्ष पर्यंत वाढले आहे. 204 पैकी 27 ठिकाणी 2015-2022 दरम्यान या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे त्यांना आढळले.

2023 हे वर्ष हृदयाच्या आरोग्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित जोखमीसाठी आव्हानात्मक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. कारण जागतिक स्तरावर या गंभीर आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

इस्केमिक हृदयरोगामुळे 100,000 लोकसंख्येमागे सुमारे 110 मृत्यू होतात. यानंतर ब्रेन हॅमरेज आणि इस्केमिक स्ट्रोकमुळे सर्वाधिक मृत्यू नोंदवले जात आहेत. तरुण वर्गही त्याचा मोठ्या प्रमाणावर बळी ठरत आहे.

रक्तदाबाकडेही लक्ष देणे आवश्यक

संशोधकांनी सांगितले की, मध्य आशिया, पूर्व युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्व या प्रदेशांमध्ये, उच्च सिस्टोलिक रक्तदाबामुळे मृत्यूचे प्रमाण दर 100,000 लोकांमध्ये जास्त असल्याचे दिसून येते.

हृदयरोग हे आता मोठे आव्हान बनत चालले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मृत्यू होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.