उन्हाळ्यात आरामदायी आणि स्टायलिश दिसणारे ‘या’ 5 प्रकारचे बॉटम वेअरबद्दल जाणून घ्या
जेव्हा आपण एथनिक वेअरबद्दल बोलतो तेव्हा आपण लेंहेंगा, साडी, सलवार सुटबद्दल बोलतो. तर सलवार, पँट, पलाझो बद्दल आपल्याला माहिती आहे, पण त्यावरही डिझाईन बाबात आपल्याला फारशी माहिती नसते. अशातच आज आम्ही तुम्हाला अशा काही बॉटम वेअरबद्दल सांगणार आहोत जे उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला आरामदायी तर वाटेल आणि स्टायलिश देखील वाटेल. तसेच तुम्ही हे कॉलेज किंवा ऑफिस करिता वेअर करू शकता जे तुम्हाला एक मॉडर्न लूक देईल.

उन्हाळ्यातील या ऋतूत उच्च तापमानामुळे आपल्याला घाम येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये आपण कॉटनचे तसेच आरामदायी व घाम शोषून घेणारे कपडे परिधान करत असतो. तसेच त्वचेला कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी आपण कॉटन फॅब्रिक असलेले कपडे परिधान करतो. अशातच कॉलेज आाणि ऑफिसला जाणाऱ्या महिलांना या दिवसांमध्ये जीन्स घालण्यास अस्वस्थ वाटते. यामुळे पुरळ आणि खाज सुटणे यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत महिलांनी असे बॉटम वेअर निवडावे जे फॅशनेबल लूकसोबतच आरामदायीही असतील. यासाठी, बाजारात काही ट्रेंडिंग आणि आरामदायी बॉटम वेअर उपलब्ध आहेत जे तुम्ही वेअर करू शकता आणि स्टायलिश दिसू शकता.
तुम्ही जर कॉलेज किंवा ऑफिसमध्ये जात असाल तर तुमच्या वॉर्डरोबचा भाग बनवण्यासाठी अनेक बॉटम वेअर पर्याय उपलब्ध आहेत. जे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्यासाठी परिपूर्ण असेल. चला तर मग आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात की उन्हाळ्यात तुम्ही जीन्स व्यतिरिक्त कोणते बॉटम वेअर घालू शकता.
जीन्सऐवजी हे 5 प्रकारचे बॉटम वेअर घाला
वाइड लेग पँट
वाइड लेग पँट तुम्हाला आरामदायी आणि फॉर्मल लूक देऊ शकते. उन्हाळ्यात तुम्ही हे टी-शर्ट किंवा शर्टसोबत वेअर करू शकता. तुम्ही ही पँट कॉलेज किंवा ऑफिसमध्येही वेअर करू शकता.
कार्गो पँट
कार्गो पँट बाहेर जाण्यासाठी आणि कॉलेजसाठी सर्वोत्तम आहेत. तुम्ही हे टी-शर्ट, क्रॉप टॉप किंवा टँक टॉपसह देखील वेअर करू शकता. हे तुम्हाला एक स्टायलिश लूक देतात. ही पँट डेनिम आणि कॉटन फॅब्रिकमध्ये येतात आणि अनेक रंग पर्याय देखील उपलब्ध असतात.
पलाझो पँट
पलाझो पँट कॉटन फॅब्रिकमध्ये येते. उन्हाळ्याच्या दिवसात ही पॅंट सर्वोत्तम आहेत, तुम्ही ते लांब कुर्ती किंवा टँक टॉपसह वेअर करू शकता. पलाझो पँट या तुम्हाला प्रिंट डिझाईन आणि प्लेन या दोन्ही पॅटर्न मध्ये येतात. पलाझो पँटचा घेर हा खूप मोठा असल्याने तुम्ही स्कर्ट वेअर केल आहेकी काय असे वाटते. तुम्हाला आरामदायी लूक देण्यासाठी तुम्ही साध्या कुर्तीसोबत फ्लोरल पलाझो वेअर करू शकता.
धोती पँट
धोती पँटबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही ते कुर्ती किंवा टॉपसोबत वेअर करू शकता आणि एथनिक लूक मिळवू शकता. हे तुम्हाला एक स्टायलिश लूक देतात. एक वेगळा लूक मिळविण्यासाठी तुम्ही ते कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही पार्टीमध्ये वेअर करू जाऊ शकता.
स्ट्रेट फिट पँट
उन्हाळ्याच्या हंगामासाठी स्ट्रेट फिट पँट किंवा ट्राउझर्स सर्वोत्तम आहेत कारण तुम्ही ते कोणत्याही टॉप, कुर्ती किंवा शर्टसह वेअर करू शकता. याच्या मदतीने तुम्ही एथनिक ते लेटेस्ट लूक तयार करू शकता. तसेच एखाद्या कार्यक्रमांसाठी स्ट्रेट फिट पँट हा एक परफेक्ट बॉटम वेअर असा आऊटफिट आहे.
