अँटी-एजिंग, सुरकुत्या होतील कमी, महागड्या ट्रीटमेंटचा इफेक्ट देणार ‘हे’ घरगुती फेसपॅक
तुम्हालाही तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवायची आहे का? मग बाजारात मिळणारी महागडी स्किन केअर प्रोडक्ट वापरण्याऐवजी हे फेस पॅक घरीच बनवा. चला या फेसपॅकबद्दल जाणून घेऊयात.

वाढत्या उष्णतेचा पारा लक्षात आपण प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेण्यास सुरूवात करतो. त्यानुसार आहारात देखील आपण बदल करतोच. त्याच बरोबर उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी ही प्रत्येकाची पहिली चिंता असते. तीव्र उष्णता, घाम आणि उन्हामुळे त्वचेची चमक कमी होते. निरोगी आणि चमकदार त्वचा टिकवण्यासाठी केवळ त्वचेची बाहेरून काळजी घेणे पुरेशी नाहीये. त्यासाठी त्वचेच्या अंतर्गत काळजी घेणे देखील आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार त्वचेचे सौंदर्य केवळ बाह्य घटकांवरच नाही तर अंतर्गत आरोग्य, योग्य आहार आणि योग्य काळजी यावरही अवलंबून असते.
एवढेच नाहीतर आयुर्वेदात सौंदर्य हे शरीराच्या संतुलनाशी जोडलेले आहे. शरीर हे तंदुरस्त असले की त्याची चमक चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते. वाढत्या वयानुसार चेहऱ्याच्या अनेक समस्या दिसू लागतात. आहार आणि स्किन केअरमध्ये बदल करून या समस्यांपासून सुटका मिळवणे सोपे आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या महागड्या, केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करा. तर यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही डाळींचे फेस पॅक आणि जायफळाचे फेस पॅक समाविष्ट करू शकता. चला तर मग या घरगुती फेसपॅक बद्दल जाणून घेऊयात.
त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी घरगुती फेस पॅक
मसूर डाळीचा फेस पॅक
उन्हाळ्यात त्वचा काळवंडते तर ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही मसुर डाळ हलकी भाजून घेऊन मिक्समध्ये बारीक करून घ्या. आता यात हळद, दूध आणि मुलतानी माती मिक्स करून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. आता हा फेसपॅक पुर्णपणे सुकल्यावर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि पॅक काढून टाका. यामुळे चेहऱ्यावरील खोलवरची घाण स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावर चमक येईल.
केशर आणि जायफळाचा फेस पॅक
उन्हाळ्यात चेहऱ्यावर केशर आणि जायफळाचा पॅक लावल्यास उत्तम परिणाम मिळतो. यासाठी केशर दुधात भिजवून जायफळ वाटून टाका. या मिश्रणात थोडे बेसन टाका आणि पेस्ट बनवा. आता तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा लावू शकता. जायफळ थेट चेहऱ्यावर लावणे टाळा. जायफळाचा वापर करतातना त्याची पूड एखाद्या घटकात मिक्स करून वापरा. कारण जायफळ थेट लावल्याने त्याच्या उष्णतेमुळे त्वचेची स्किन निघू शकते.
बाह्य सौंदर्याइतकेच आंतरिक सौंदर्यही महत्त्वाचे आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्या आहारात भरपूर पाणी, बीट, ताजी फळे, आवळा आणि डाळिंब यांचा समावेश करा. दुधासोबत खारट पदार्थ, तसेच दही आणि गोड फळांसोबत आंबट फळे यांसारखे पदार्थ खाणे टाळा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)