AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर या गोष्टी पाळा आणि घटस्फोट टाळा! नवविवाहित दाम्पत्यानं वाचलंच पाहिजे

Married Life Tips लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर स्वप्न असतं. पण जेवढं हे सुंदर वाटतं तेवढंच हे नातं आणि लग्नानंतरचं आयुष्य कठिण असतं. मुलगा असो वा मुलगी या दोघांच्या आयुष्यात या लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात. हे झालेले बदल अनेक जोडप्याना स्विकारणं कठिण जातं. सुरुवातीला वाटणारं गोडं गोडं आयुष्य जेव्हा एका प्रवासाला सुरुवात करतात त्या अनेक गोष्टी येतात. चढउतार येतात अशावेळी जर तुम्ही काही गोष्टी लग्नापूर्वीच माहिती करुन घेतल्या नाही तर तुमच्यामध्ये वाद आणि त्या वादाचं रुपांतर घटस्फोटात होतं.

लग्नानंतर या गोष्टी पाळा आणि घटस्फोट टाळा! नवविवाहित दाम्पत्यानं वाचलंच पाहिजे
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 31, 2022 | 5:03 PM
Share

लग्न हे लव्ह मॅरेज असो वा अँरेज मॅरेज लग्नानंतरचं नातं आणि आयुष्यात दोघांसाठीही बदलणार असतं. लग्नापूर्वीचे दिवस फार छान वाटतात. त्यावेळी आपण फक्त भावी आयुष्याचा स्वप्नात रंगलो असतो. लग्नाची तयारी खरेदी यात वेळ जातो. पण जे दोघे या नात्यात अडकणार आहेत त्यांना काही गोष्टी नक्की माहिती करुन घ्यायला हवं. नाही तर लग्नानंतर या छोट्या छोट्या गोष्टीतून वाद होतात आणि वेळ नातं तुटणाकडे जातं. म्हणं आज आपण भावी जोडप्याला काय माहिती हवी ते जाणून घेणार आहोत.

1. भावी जोडीदारासोबत मनमोकळेपणाने बोला

कुंडली जुळली एकमेकांना बघितलं चार गोष्टी मोठ्यांनी पाहिल्या की आपण लग्नाला हो म्हणतो. पण बस येवढ्यावर समाधानी राहू नका. लग्न ही एक मोठी जबाबदारी असते. त्यात दोन अनोळखी व्यक्तींना एकत्र अख्ख्य आयुष्य काढायचं असतं. त्यामुळे भावी जोडीदारासोबत मनमोकळेपणाने बोला. एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घ्या, लग्नाबद्दल, नात्याबद्दल, संसाराबद्दल त्याचा काय विचार आहे. काय संकल्पना आहे हे समजून घ्या. त्याची नोकरी कशी आहे. याकरावं लागतं त्यात हे समजून घ्या. यासाठी एकमेकांना भेटा किंवा फोनवर बोला. त्यातून एकमेकांना स्वभाव कळतो, त्याचं व्यक्तिमत्व कळतं. ज्यामुळे पुढच्या आयुष्याचा टप्पा सोपा जातो.

2. लग्नापूर्वी काय विषयांवर चर्चा गरजेची

लग्न म्हणजे फक्त प्रेम, सेक्स येवढंच नसतं. त्यात अनेक गोष्टी येतात. आर्थिक बाजू, व्यवहार, करियर अगदी चोवीस तास सोबत राहायचं म्हटलं की दैनदिन गोष्टी येतात. मग अशावेळी लग्नापूर्वी जोडीदाराला काही प्रश्न स्पष्ट विचारा.लग्नानंतर आपण कुठे राहणार आहोत. एकत्र कुटुंब पद्धती की आपण दोघे वेगळे राहणार आहोत. त्याबद्दलची दोघांची संकल्पना समजून घेणे. नोकरी कशी आहे फिरती आहे की एकाच शहरात असणार आणि ऑफिसमधील कामाचं शिफ्ट स्वरुप कसं असणार. दोघांचं करिअर बद्दल काय मतं आहे, आर्थिक व्यवहाराची घडी कशी असणार आहे. अशाप्रकारचे प्रश्न आधीच विचारुन घ्या. जेणे करुन लग्नानंतर त्या गोष्टींवरुन वाद होणार नाही. आणि आपण एकमेकांसोबत या विचारांतून एकत्र जगू शकतो का याची कल्पना आपल्याला येते

3. लग्नासाठी तुम्ही होकार दिला पण तुम्ही तयार आहात का?

हो, हा प्रश्न नक्की विचारा कारण हा तुम्हा दोघांच्या आयुष्यभराचा प्रश्न असतो. कारण काही मुलंमुली घरच्यांचा जबरदस्तीने लग्नाला हो म्हणतात, तर काही घरच्यांनी हो म्हटलं आहे तर ठिक आहे मग माझा पण होकार आहे. पण अनेक वेळा मुला असो वा मुलगी शारीरिक म्हणा की मानसिकरित्या लग्नासाठी तयार नसतात. मग अशावेळी ही लग्न झाली तर ती कालांतराने टिकत नाहीत. हे नातं आपल्याला जड होतं.

4. जबाबदारी

लग्न म्हणजे एक जबाबदारी आहे. त्या व्यक्तीची जबाबदारी तिच्या सुखदुखाची जबाबदारी, त्या कुटुंबाची जबाबदारी अगदी एकमेकांना समजून एकमेकांसाठी उभे राहण्याची जबाबदारी ही भावना असेल तर ही लग्नाची जबाबदारी उचलला. अगदी मनापासून तुम्ही त्या व्यक्तीचा त्या नात्या जबाबदारीचा स्विकार करणार असाल तर लग्नाला हो म्हणा. त्यासाठी भावी जोडदारासोबत याविषयी नक्की चर्चा करा.

5. सेक्स

हो, बरोबर वाचलं तुम्ही. भावी जोडीदाराचं सेक्सकडे बघण्याचा दुष्टीकोन कसा आहे. त्याबद्दल त्याचं काय मतं आहे. हे नक्की समजून घ्या. कारण लग्न म्हणजे जबाबदारी, आदर, प्रेम या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत तसं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. अनेक नाती ही आपल्या जोडीदार आपल्याला रात्री सुखी ठेवू शकतं नाही म्हणून आजकाल तुटताना दिसत आहेत.

टीप : हा लेख अनुभव आणि अनेकांशी नात्याबद्दल बोलल्यानंतर प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे. या लेखाचा उद्देश येवढाच आहे, की नातेसंबंध समजून ते निभवण्यासाठी मदत व्हावी. अगदी प्रत्येक गोष्टी तशाच झाल्या पाहिजे असाही अट्टाहास नसावा. तुमच्यातील समजूतदारपणा हा फार महत्त्वाचा असतो.

 इतर बातम्या-

तरुण आणि विद्यार्थी या देशाचं भविष्य, रस्त्यावर आंदोलन करणं चुकीचं – हिंदुस्थानी भाऊ

Students Agitation : जे भल्या भल्या नेत्यांना, अभिनेत्यांना जमत नाही ते हिंदुस्थानी भाऊने कसे करुन दाखवलं? कसे जमा केले विद्यार्थी?

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.