AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तासन् तास लॅपटॉपवर काम करून डोळे दुखतायत?  ‘हे’ उपाय नक्की करून पाहा!

'वर्क फ्रॉम होम’मुळे आपण आपला बहुतेक वेळ लॅपटॉप स्क्रीन किंवा मोबाईल स्क्रीन पाहण्यात घालवत असतो. त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर पडतो.

तासन् तास लॅपटॉपवर काम करून डोळे दुखतायत?  ‘हे’ उपाय नक्की करून पाहा!
| Updated on: Jan 18, 2021 | 3:29 PM
Share

मुंबई : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना घरून काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला ‘वर्क फ्रॉम होम’ ही नवीन संस्कृती स्वीकारणे प्रत्येकासाठी कठीण होते. कंपनी आणि कर्मचारी या दोघांनाही बर्‍याच समस्यांमधून जावे लागले. परंतु, लॉकडाऊनच्या दीर्घ कालावधीमुळे हळूहळू सगळ्यांनाच याची सवय झाली. यातही मजेशीर गोष्ट म्हणजे आता लोकांना ‘वर्क फ्रॉम होम’ इतके आवडू लागले आहे की त्यांना पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन काम करायचे नाही. यासाठी ते पगारामध्ये तडजोड करण्यासही तयार आहेत. मात्र, दिवसभर संगणक आणि लॅपटॉप समोर बसल्याने डोळ्यांवरचा ताण वाढू लागला आहे (Tips To prevents eye problems during work from home).

‘वर्क फ्रॉम होम’मुळे आपण आपला बहुतेक वेळ लॅपटॉप स्क्रीन किंवा मोबाईल स्क्रीन पाहण्यात घालवत असतो. त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर पडतो. सतत संगणकाच्या पडद्यासमोर काम केल्याने आपले डोळे दिवसभर थकलेले दिसतात. यामुळे काही कालावधीनंतर डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात.

जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांमध्ये लालसरपणा, खाज सुटणे आणि डोकेदुखी अशा समस्या उद्भवतात. जर आपल्यालाही डोळ्यांसंबंधित अशी समस्या येत असेल, तर आम्ही आपल्याला काही खास टिप्स देणार आहोत ज्याद्वारे आपण स्क्रीनच्या हानिकारक प्रकाशापासून निर्माण होणाऱ्या समस्या टाळू शकतात.

‘या’ टिप्स नक्की वापरा!

– संगणक आणि लॅपटॉपवर काम करत असताना, आपले डोळे आणि स्क्रीन दरम्यान कमीत कमी 20 इंच अंतर असले पाहिजे.

– मोबाईल आणि लॅपटॉपचा निळा प्रकाश टाळण्यासाठी आपण हलका पिवळा प्रकाश किंवा निळा प्रकाश असणारा फिल्टर अ‍ॅप वापरू शकता (eyes problems).

– आपण लॅपटॉपवर बर्‍याच काळासाठी काम करत असताना 20-20-20चे सूत्र वापरू शकता. याचा अर्थ दर तासाला 20 मिनिटे ब्रेक घ्या, 20 इंच अंतर ठेवा आणि 20 मिनिटे नजर दुसरीकडे वळवा.

– मॉनिटर किंवा लॅपटॉपच्या समोर बसतांना मॉनिटर तुमच्या डोळ्यांपेक्षा खूप खाली नाही आणि जास्त उंच नाही याची खात्री करुन घ्या.

– बराच वेळ काम केल्यावर जर तुमचे डोळे कोरडे होऊ लागले, तर डोळे थंड पाण्याने धुवा.

– डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्यास 10 मिनिटांसाठी ग्रीन टीची एक थंड पिशवी डोळ्यावर ठेवा.

– जास्त दिवस काम केल्यामुळे डोळ्यांभोवती त्रास होत असेल, तर स्क्रीन बंद करा आणि काही काळ विश्रांती घ्या.

– या व्यतिरिक्त, आपण आपल्या डोळ्याभोवतालच्या स्नायूंना आराम देण्यासाठी बोटांनी हलका दाब देऊन मसाज करू शकता.

(Tips To prevents eye problems during work from home)

हेही वाचा :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.