AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न झालेल्या जोडप्यांनी या 3 गोष्टी लक्षात ठेवाव्यात, कधीच येणार नाही नात्यात दुरावा

पती आणि पत्नी यांच्यातील नात्यात अनेकदा काही ना काही रुसवे - फुगवे सुरुच असतात. अशा वेळी आपल्याला काळजी घेण्याची गरज असते. त्यामुळे आपले पती-पत्नीचे नाते सुदृढ करायचे असेल तर या तीन गोष्टींची काळजी घ्यायलाच हवीच...

लग्न झालेल्या जोडप्यांनी या 3 गोष्टी लक्षात ठेवाव्यात, कधीच येणार नाही नात्यात दुरावा
| Updated on: Nov 05, 2024 | 5:46 PM
Share

प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये छोठ्या- मोठ्या कुरुबुरी सुरुच असतात. संसार म्हटला की भांड्याला भांडे लागायचे असे म्हटले जाते. त्यामुळे अनेक घरात थोड्या फार फरकाने हेच सुरु असते. परंतू जर तक्रारी जास्तच वाढल्या तर नात्यात कटूता निर्माण होते. परस्परातील मतभेद इतके वाढतात की दोघांच्या नात्यात मोठी दरी तयार होते त्यामुळे नाते तुटण्यापर्यंत वेळ येते. त्यामुळे जोडप्यांनी स्वत:तील मतभेद तातडीने दूर करणे गरजेचे असते. त्यामुळे या तीन गोष्टी तुम्हाला फायद्याच्या ठरतील त्यांचे पालन केल्याचे नात्यात गोडवा तयार होण्यास मदत मिळते.

पार्टनरला पुरेसा वेळ द्या

प्रत्येक नात्याला मजबूत करण्यासाठी वेळ देणे महत्वाचे असते. पती-पत्नीच्या नात्यात देखील हे गरजेचे असते. आजकाल कामावर जाणाऱ्या जोडप्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही. त्यामुळे आपले नाते हेल्थी होत नाही. पती-पत्नी यांच्या दुरी कायम राहाते. त्यामुळे पुढे हे नाते कमजोर होते. त्यामुळे प्रयत्न करुन पार्टनरसाठी वेळ काढाच..

बातचीत गरजेची

तुम्ही अनेकदा पाहीले असेल लढाई पेक्षा चर्चा आणि बोलण्या ने समस्या सुटत असतात. त्यामुळे आपल्या पार्टनरला काही बाबीचा राग आला असेल तर त्याच्याशी बोलून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहीजे. इगो किंवा इतर कारणाने जर बोलणेच बंद केले तर नाते कमजोर होते.त्यामुळे छोट्या चुकीचा देखील मोठा फटका आपल्या नात्यात कटुता आणण्यास कारणीभूत ठरु शकतो.

चुक कबूल करा

अनेकदा आपल्या कडून कळत- नकळत चुक झालेली असते. त्यामुळे पार्टनरचे मन दुखावलेले असू शकते. परंतू रागाच्या भरात आपल्याला आपली चूक कळत नाही. असे करणे योग्य नाही. जर आपल्या कोणत्या कृतीमुळे पार्टनरला दु:ख झाले असेल तर आपण आपल्या पार्टनरला सॉरी बोलण्यास मागे पुढे पाहू नये.आपले हे सॉरी बोलणे आपल्या नात्यास दूरावा निर्माण होण्यास रोखू शकतो.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.