AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gen Z च्या सुट्टीचा नवा फंडा… आधी कॉन्सर्ट, मग ठरतं डेस्टिनेशन; असा करतात ट्रिपचा प्लॅन!

GenZ Travel Trend: ट्रॅव्हलिंगचा ट्रेंड झपाट्याने बदलतोय आणि Gen Z ने त्यात आणखी रंग भरला आहे. आता फक्त एखादं डेस्टिनेशन ठरवून ट्रिप करण्याऐवजी खास अनुभवाच्या निमित्ताने ट्रिप प्लॅन केली जाते. Gen Z चा हा भन्नाट ट्रॅव्हल फंडा नेमका काय आहे, जाणून घ्या...

Gen Z च्या सुट्टीचा नवा फंडा… आधी कॉन्सर्ट, मग ठरतं डेस्टिनेशन; असा करतात ट्रिपचा प्लॅन!
Travel
| Edited By: | Updated on: Oct 03, 2026 | 2:45 PM
Share

आजची Gen Z पिढी ट्रॅव्हलिंगचा पारंपरिक फॉर्म्युला बदलताना दिसत आहे. पूर्वी आधी गोवा, जयपूर किंवा दुबईसारखं डेस्टिनेशन ठरवलं जायचं, त्यानंतर फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग करून शेवटी ‘काय करायचं?’ याची यादी तयार केली जायची. मात्र, Gen Z ने हा संपूर्ण क्रमच बदलला आहे. आता ट्रिपची सुरुवात एखाद्या कॉन्सर्टच्या तिकिटापासून, म्युझिक फेस्टिव्हल, थीम पार्क, फूड एक्सपीरियन्स किंवा एखाद्या खास कार्यक्रमापासून होऊ शकते आणि त्यानंतर त्या अनुभवासाठी डेस्टिनेशन ठरवलं जातं. त्यामुळे आता ‘कुठे जायचं?’पेक्षा ‘काय अनुभवायचं?’ याला अधिक महत्त्व दिले जात आहे.

Gen Z च्या या बदलत्या ट्रॅव्हल ट्रेंडचं मोठं उदाहरण म्हणजे कॉन्सर्ट आणि म्युझिक फेस्टिव्हल. Airbnb च्या 2026 मधील ‘Experience-led Travel Insights’नुसार, 62 टक्के भारतीय Gen Z प्रवाशांनी कॉन्सर्ट किंवा म्युझिक फेस्टिव्हलसाठी प्रवास करण्याची योजना आखली होती. तर 76 टक्के जणांनी सांगितलं की, एखाद्या कॉन्सर्ट किंवा फेस्टिव्हलमुळे ते पहिल्यांदाच एखाद्या शहरात गेले. यातील निम्म्याहून अधिक जणांनी कार्यक्रमानंतर त्या शहरात फिरण्यासाठी मुक्कामही वाढवला. म्हणजेच एखादा खास अनुभव हा प्रवासाचा सुरुवातीचा ट्रिगर ठरतो आणि त्यानंतर डेस्टिनेशन त्या अनुभवाचा भाग बनतं.

तीन दिवसांची छोटी ट्रिप ठरतेय पसंतीची

लांबच्या सुट्टीपेक्षा Gen Z आता छोट्या ट्रिपला पसंती देत असल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. Airbnb च्या 2026 च्या संशोधनानुसार, 10 पैकी 7 भारतीय Gen Z प्रवासी एका मोठ्या वार्षिक सुट्टीपेक्षा तीन दिवसांच्या छोट्या ट्रिपला पसंती देतात. यामागे कमी वेळात एखादा खास अनुभव घेण्याची इच्छा हा एक महत्त्वाचा घटक आहे.

कॉन्सर्टपासून फूड फेस्टिव्हलपर्यंत

Gen Z च्या ट्रिपचा ट्रिगर केवळ कॉन्सर्ट नसतो. थीम पार्क, फूड फेस्टिव्हल, स्पोर्टिंग इव्हेंट, वेलनेस रिसॉर्ट किंवा सोशल मीडियावर पाहिलेला एखादा खास अनुभवही प्रवासाचं कारण ठरू शकतो. सोशल मीडियामुळे एखादा कॅफे, म्युझिक फेस्टिव्हल, अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी किंवा सुंदर ठिकाण पाहून त्यासाठी खास ट्रिप प्लॅन करण्याचा ट्रेंडही वाढत आहे.

भारतातील पर्यटनालाही मिळू शकतो फायदा

या ट्रेंडमुळे देशात फिरण्याच्या पद्धतीतही बदल होऊ शकतो. एखाद्या शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांपेक्षा कॉन्सर्ट, म्युझिक फेस्टिव्हल, थीम पार्क, स्पोर्टिंग इव्हेंट, फूड फेस्टिव्हल किंवा रिसॉर्टदेखील पर्यटकांसाठी प्रवासाचं कारण बनू शकतात. म्हणजेच आधी डेस्टिनेशन ठरवण्याऐवजी, आपल्याला काय अनुभवायचं आहे हे निवडायचं आणि त्यासाठी कुठे जायचं हे ठरवायचं—असा Gen Z च्या ट्रॅव्हलिंगचा नवा फंडा दिसत आहे.

Follow Us
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं