AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weekend Trip | आठवडाभराच्या ताणाने कंटाळलायत? मग, मुंबईतील ‘या’ विरंगुळ्याच्या ठिकाणांना नक्की भेट द्या!

ताण कमी करण्यासाठी कुटुंब अथवा मित्रमंडळींसोबत पिकनिकच्या निमित्ताने एक छोटा ब्रेक घेणे, हे नेहमीच फायद्याचे ठरते. कारण, त्यामुळे आपण भविष्यात अधिक जोमाने काम करण्यासाठी तयार होतो.

Weekend Trip | आठवडाभराच्या ताणाने कंटाळलायत? मग, मुंबईतील ‘या’ विरंगुळ्याच्या ठिकाणांना नक्की भेट द्या!
विश्व विपश्यना पॅगोडा
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 1:32 PM
Share

मुंबई : आठवडाभराचा ताणतणाव आणि कामच्या थकव्यानंतर प्रत्येक माणसाला विरंगुळा अथवा मनोरंजनाची गरज असते. सध्या घरातूनच काम सुरु असल्याने अगदी पाय मोकळे करायलाही घराबाहेर पडता येत नाही. अशावेळी हा ताण कमी करण्यासाठी कुटुंब अथवा मित्रमंडळींसोबत पिकनिकच्या निमित्ताने एक छोटा ब्रेक घेणे, हे नेहमीच फायद्याचे ठरते. कारण, त्यामुळे आपण भविष्यात अधिक जोमाने काम करण्यासाठी तयार होतो. जर कामातून फार वेळ मिळत नसेल, तर एखाद्या विकेंडला मुंबईतच पिकनिकला जाण्यासारखीदेखील अनेक ठिकाणं आहेत (Weekend trip spots in Mumbai  for one day picnic).

तसे मुंबई हे सतत धावणारे शहर आहे. बाहेरगावाहून आलेले अनेक लोक मुंबईत कामानिमित्त वास्तव्य करतात. त्यामुळे कामाच्या निमित्ताने सतत गर्दी आणि वर्दळ मुंबईत पाहायला मिळते. मात्र, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही गर्दी काहीशी कमी झालेली पाहायला मिळते. मुंबईत अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही पावसाळ्यात फेरफटका मारून आपला ताण आणि थकवा दूर करू शकता. चला तर, जाणून घेऊया अशाच काही ठिकाणांबद्दल…

संजय गांधी नॅशनल पार्क

मुंबईत बोरीवलीमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे. 104 क्षेत्रफळात पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानात अनेक पर्यंटक वर्षभर पर्यटनासाठी येत असतात. या ठिकाणी तुम्ही कान्हेरी लेण्या, सिंहविहार, वनराणी अशा विविध ठिकाणी फिरू शकता. कुटुंब अथवा मित्रमंडळींसोबत तुम्ही या ठिकाणी एक दिवस एकत्र फिरण्यासाठी येऊ शकता. या नॅशनल पार्कमध्ये जवळजवळ 40 ते 50 वन्यप्राणी, 250 प्रकारचे पक्षी आणि हजारो प्रकारचे वृक्ष आहेत.

माथेरान

माथेरान हे रायगड जिल्हातील एक थंड हवेचं ठिकाण आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरातून अनेक पर्यटक उन्हाळ्याच्या सुट्टीत या ठिकाणी गर्दी करतात. निसर्गसौदर्यांने नटलेल्या माथेरानवर अनेक पॉईंट्स प्रसिद्ध आहेत. ज्या ठिकाणांवरून निसर्गाचे विलक्षण दृश्य तुम्ही पाहू शकता (Weekend trip spots in Mumbai  for one day picnic).

सगुणा बाग

नेरळ रेल्वेस्थानकावर उतरून तुम्ही सगुणाबागेत जाऊ शकता. कर्जत जिल्हातील सगुणा बाग हे खास कृषीप्रेमी आणि गावाकडचा अनुभव हव्या असलेल्या पर्यटकांसाठी तयार केलेले आहे. या ठिकाणी तुमची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली जाते. ज्यामुळे एक ते दोन दिवस तुम्ही सगुणाबागेत आरामासाठी जाऊ शकता. बैलगाडी सफर, झोपाळे, मातीची घरे, स्नेक शो, बोटिंग, फिशिंग, शेतातून केलेली भटंकती, विविध प्रकारचे पक्षी, प्राणी अशा अनेक गोष्टींचा आनंद तुम्ही सगुणाबागेत घेऊ शकता.

कर्जत विकेंड फार्म हाऊस

कर्जत तालुक्यात अनेक फार्म हाऊस आहेत. ज्या ठिकाणी कुटुंबासोबत तुम्ही एक ते दोन दिवस पिकनिकसाठी जाऊ शकता. या फार्म हाऊसवर राहण्यासाठी आणि खाण्याची उत्तम सोय करण्यात येते. त्यामुळे अनेकजण कुटुंब आणि  मित्रमंडळींसोबत विकऐंडला या फार्म हाऊसवर जातात. स्वतंत्र स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधबे असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पिकनिकचा आनंद लुटू शकता.

विश्व विपश्यना पॅगोडा

विश्व विपश्यना पॅगोडा हे मुंबईतील गोराई येथे आहे. 2000 साली हा पॅगोडा बांधण्यात आला. या ठिकाणी विपश्यना करण्यासाठी देशविदेशातून लोक येतात. या भव्यदिव्य पॅगोडामध्ये एकाच वेळी दहा हजार लोक एकत्र बसण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी मानसिक शांतता मिळवण्यासाठी, मेडिटेशन, वास्तूसौंदर्य पाहण्यासाठी,फोटोग्राफी, फिरण्यासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता. या वास्तूला गोल्डन पॅगोडा देखील म्हणतात.

(टीप : देशभरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, यातील काही ठिकाणी कडक तर काही ठिकाणी सौम्य निर्बंध लादण्यात आले आहेत. कृपया नियम पाळून, वेळ आणि निर्बंध लक्षात घेऊनच सदर ठिकाणी प्रवास करावा.) 

(Weekend trip spots in Mumbai  for one day picnic)

हेही वाचा :

हिमालयातील सुंदर घाटीची सैर करा अवघ्या 11 हजार रुपयांत!

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.