वजन कमी करण्याचे पाच अजब ट्रेंडिग डाएट

हे डाएट घेण्यामागे एकच उद्देश असतं, ते म्हणजे कमी कॅलरीजचं सेवन करणे.

वजन कमी करण्याचे पाच अजब ट्रेंडिग डाएट

मुंबई : वाढलेलं वजन हे आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची समस्या आहे. काही लोकांसाठी वजन कमी करणे सोपे असतं, तर काहींसाठी ते खूप कठीण असतं. त्यासाठी लोक जिममध्ये तासंतास घाम गाळतात (Obesity). अनेक प्रकारचे व्यायाम करतात, निरनिराळे डाएट करतात (Trending Diet Plan). वाढत्या वजनाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक आप-आपल्या हिशोबाने वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट फॉलो करत आहेत. त्यामुळे नवीन नवीन डाएट ट्रेंड येत असतात. सध्या वजन कमी करणारे असेच काही डाएट ट्रेंडमध्ये आहेत (Trending Diet Plan).

पाहा सर्वात अनोखे आणि अजब वेट लॉस डाएट

बेबी फूड डाएट

हे डाएट घेण्यामागे एकच उद्देश असतं, ते म्हणजे कमी कॅलरीजचं सेवन करणे. या प्रकारच्या डाएटमध्ये लोक सामान्य जेवणाच्या बदल्यात बेबी फूड म्हणजेच लहान मुलांचं जेवण घेतात. हे बेबी फूड नाश्त्याला पर्याय म्हणून घेता येतं.

ज्युस डाएट

ज्युस डाएट मध्ये कुठल्याही प्रकारचं सॉलिड फूड घेतलं जात नाही. या डाएटमध्ये फक्त फळ आणि भाज्यांचा रस पितात. लवकर वजन कमी करण्यासाठी हे सर्वात लोकप्रिय डाएट आहे.

आरश्यासमोर बसून जेवणे

आरश्यासमोर बसून स्वत:ला जेवताना पाहणे, हे जरा विचित्र आहे. पण या डाएला फॉलो करणाऱ्यांचे याबाबत वेगळं मत आहे. त्यांच्यामते, आरश्यासमोर बसून जेवल्याने त्यांना माहित राहतं की ते किती खात आहेत. त्यामुळे खाण्यावर नियंत्रण मिळवण्यात मदत होते आणि वजन कमी करणे सोपे होते.

गडद निळ्या रंगाच्या ताटात जेवण करणे

गडद निळ्या ताटात जेवण केल्याने लवकर भूक लागत नाही. हे डाएट फॉ़लो करणाऱ्यांच्या मते फिक्या रंगाच्या ताटात लोक जास्त जेवण करतात. जेव्हाकी गर्द रंगाच्या ताटात कमी जेवण घेतल्यावरही ते जास्त दिसतं.

रॉ फूड डाएट

रॉ फूड डाएटमध्ये प्लांट बेस्ड फूड डाएट घेतलं जातं, म्हणजे झाडावर लागणारी फळं, भाज्या. हे अन्न 46 अंश सेल्सिअसच्यावर शिजवण्यात येत नाही. हे रॉ फूड पूर्णपणे ऑर्गानिक असतं.

नोट : वजन कमी करण्यासाठी वर दिलेले उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *