AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या बचावापासून ते स्टाईल पर्यंत ‘हे’ विंटर स्कार्फ आहेत परफेक्ट ऑप्शन

थंडीचा हंगाम येताच उबदार कपडे परिधान करण्यास सुरूवात होते. हिवाळ्यात स्टाईल टिकवून ठेवणं थोडं अवघड काम असतं. पण जर तुम्ही तुमच्या आउटफिटसोबत स्कार्फ कॅरी केला तर लुकही एकदम स्टायलिश दिसेल.

थंडीच्या बचावापासून ते स्टाईल पर्यंत 'हे' विंटर स्कार्फ आहेत परफेक्ट ऑप्शन
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 6:29 PM
Share

थंडीचा हंगाम सुरु झाला असून थंडीत स्वेटर, जॅकेट, कोट असे सर्व कपडे आता कपाटामधून बाहेर आले आहेत. पण या सीझनमध्ये फॅशनेबल कसं दिसावं याबद्दल लोकं नेहमी विचार करत असतात. कारण या दिवसांमध्ये घराबाहेर पडताना आपण स्वेटर आणि कानटोपी घालून बाहेर पडतो. तसेच हिवाळ्याच्या दिवसात थंडीपासून बचाव करण्यासाठी व तुमची फॅशन जपण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे हुडी किंवा स्वेटशर्ट आले आहेत जे घेऊन तुम्ही स्टायलिश दिसू शकता.

पण हिवाळ्यात तुम्हाला तुमच्या स्टाईलची थोडी काळजी वाटत असेल तर थंडीच्या दिवसात तुम्ही स्कार्फला आउटफिटचा भाग बनवा. हल्ली बाजारात खूप ट्रेंडी स्कार्फ आले आहेत. हिवाळ्यात आपल्या वॉर्डरोबमध्ये स्कार्फचा समावेश कसा करावा हे आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.

प्रिंटेड स्कार्फ

थंडीच्या दिवसात तुम्ही तुमच्या कपड्यांमध्ये प्रिंटेड स्कार्फचा समावेश करू शकता. सर्व प्रकारच्या आउटफिटमध्ये प्रिंटेड स्कार्फ चांगले दिसतात. थंडीपासून तुमचे रक्षण करण्याबरोबरच स्टाईल स्टेटमेंटमध्येही ते तुम्हाला पुढे ठेवतील. यासाठी तुम्ही बाजारात किंवा ऑनलाइन पद्धतीने तुम्ही तुमच्या बजेटनुसार प्रिंटेड स्कार्फ खरेदी करू शकता.

प्लेन स्कार्फ

अनेकदा आपण अगदी साधे सिंपल कपडे परिधान करतो, जो तुमच्या स्टाईल उठून दिसत नाही. अशावेळी तुम्ही प्लेन स्कार्फ घेऊ शकता. यामुळे तुमचा लुक एकदम स्टायलिश दिसेल. प्लेन स्कार्फसाठी तुम्ही हलक्या राखाडी किंवा क्रीम रंगासारखे स्कार्फ निवडू शकता.

चेक्स स्कार्फ

चेक्सबॉक्ससह शर्टच नाही तर स्कार्फही खूप सुंदर दिसतात. यामुळे तुम्ही थंडीच्या दिवसात सर्व प्रकारच्या कपड्यांवर चेक्स स्कार्फ चांगले दिसतात. लाल, निळा, राखाडी किंवा हलका पिवळा रंगाचे स्कार्फ हे तुमच्या आउटफिटचा भाग बनवा. असे स्कार्फ साधे लुक हायलाइट करण्याचे ही काम करतात.

फ्लफी स्कार्फ

फ्लफी स्कार्फ दिसायला खूप सुंदर असतात. हे स्कार्फ थोडे पफसारखे फुगीर असतात जे कोणत्याही आऊटफिटवर आकर्षक दिसतो. आपल्या पैकी बऱ्याच मुलींना हा स्कार्फ खूप आवडतो. हा स्कार्फ तुमच्या कानात थोंडात व नाकात थंड हवा जाऊ देत नाही. त्यामुळे तुम्ही हा स्कार्फ ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे खरेदी करू शकता. स्टाईल वाढवण्यासाठी तुम्ही फ्लफी स्कार्फ कॅरी करू शकता.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.