AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॅलेंटाइन डे स्पेशल मेन्यू सादर करीत आहे, “गर्लफ्रेंड केक, मेरा बाबू केक”!

नुकतीच व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये एका बेकरीने एक पाऊल पुढे टाकत प्रेमाचा महिना साजरा केला. यात व्हॅलेंटाइन डे स्पेशल मेन्यू सादर करण्यात आला असून केकचे नाव पाहून तुम्ही थक्क व्हाल!

व्हॅलेंटाइन डे स्पेशल मेन्यू सादर करीत आहे, गर्लफ्रेंड केक, मेरा बाबू केक!
Valentine Day 2023Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 10, 2023 | 6:17 PM
Share

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. तसं तर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्याही बहाण्याची किंवा खास दिवसाची गरज नाही. पण व्हॅलेंटाइन वीक खास मानला जातो कारण या काळात कपल्स एकत्र बसतात आणि नाते आणखी मजबूत करण्याचे आणि त्यांच्या वेळेचा आनंद घेण्याचे वचन देतात. नुकतीच व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये एका बेकरीने एक पाऊल पुढे टाकत प्रेमाचा महिना साजरा केला. यात व्हॅलेंटाइन डे स्पेशल मेन्यू सादर करण्यात आला असून केकचे नाव पाहून तुम्ही थक्क व्हाल!

ही मजेशीर पोस्ट इन्स्टाग्रामवर इमोबोइस ऑफ इंडिया नावाच्या अकाऊंटने शेअर केली आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की बेकरीचे नाव लिहिले आहे आणि खाली तुम्हाला बेकरीच्या व्हॅलेंटाइन डे स्पेशल मेनूचे रंगीत पोस्टर दिसेल.

तसं पाहिलं तर मेन्यूमधला प्रत्येक केक वेगवेगळ्या रंगांच्या नात्यांना समर्पित असतो. मेन्यूमध्ये ‘गर्लफ्रेंड केक’, ‘मेरा बाबू केक’, ‘पहला प्यार केक’, ‘एक तरफा प्यार केक’, ‘प्यार में धोका केक’, ‘केक फॉर सिंगल’ आणि ‘बॉयफ्रेंड केक’ यांचा समावेश आहे.

प्रत्येक केकच्या नावासोबतच केकची किंमत तसेच फोटोही पाहता येतो. दुकानाबाहेर जणू काही पोस्टर आहे असे वाटते. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक याबाबत सतत बोलत आहेत. यावर एका युजरने कमेंट करत लिहिलं, ‘भाईसाहेब!” तर आणखी एका युजरने लिहिलं की, ‘गर्लफ्रेंड केकपेक्षा बॉयफ्रेंड केक महाग का आहे हे मला समजत नाही.’

Follow Us
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.