Beauty Tips: कलिंगडाच्या बियांचे तेल सौंदर्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा फायदे

कलिंगडाच्या (Watermelon) बियांचे तेल जीवनसत्त्वे ए, बी, ई, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यातील अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् त्वचेला हायड्रेटेड आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. या बियांमुळे सौंदर्यावाढीसाठी काय काय फायदे मिळतात जाणून घ्या.

Beauty Tips: कलिंगडाच्या बियांचे तेल सौंदर्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा फायदे
कलिंगडाच्या बियांचे तेलाचे सौंदर्यावाढीसाठी फायदे जाणून घ्या.
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 6:05 PM

उन्हाळ्याच्या सिझिनमध्ये (Summer Season) वातावरण लोकांच्या आरोग्याच्या (Health) आणि सौंदर्याच्या (Beauty) समस्या वाढवते. पण काही लोक उन्हाळ्याची आवर्जून वाट पाहत असतात. आंबा, टरबूज, ताडगोळे, द्राक्ष, यांसारखी या मोसमात मिळणारी स्वादिष्ट फळे हे त्यामागचे कारण आहे.

कलिंगडाचं वैशिष्ट्य म्हणजे ते चवदार असण्यासोबतच उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. सामान्यतः प्रत्येकजण ते खाताना त्याच्या बिया फेकतो, परंतु तुम्हाला माहित आहे का? की कलिंगडा प्रमाणेच त्याच्या बिया (watermelon seed oil beauty benefits) देखील तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात.होय, तुम्ही कलिंगडाच्या बिया त्वचेच्या किंवा सौंदर्याच्या काळजीसाठी वापरू शकता. तज्ज्ञांच्या मते, या बियांपासून बनवलेले तेल उन्हाळ्यातील अनेक समस्यांपासून तुमचे रक्षण करते. केस आणि त्वचेच्या रक्षण करता तर हे अत्यंत फायदेशीर आहे.

हे तेल जीवनसत्त्वे ए, बी, ई, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामध्ये असलेले अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स त्वचेला हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. कलिंगडाच्या बियांच्या तेलाचे सौंदर्याच्या वाढीसाठी काय फायदे आहेत जाणून घ्या.

हे सुद्धा वाचा

एंटी-एजिंग त्वचेवर सुरकुत्या पडणे ही आज एक कॉमन समस्या बनली आहे. तणाव आणि अन्न हे याचे कारण असू शकते, परंतु एकदा ते त्वचेवर आले की त्यापासून सहज मुक्त होणं सोपं नसते. कलिंगडाच्या बियांच्या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. तज्ञांचा असा विश्वास आहे की ते वृद्धत्व म्हणजेच एंटी एजिंग रोखण्याचे काम करते. ओलिक ऍसिड चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या रोखते.

पुरळ चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असणे ही एक सामान्य समस्या आहे. पण, जर त्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर ते खूप अवघड होऊ शकते. त्यामुळे होणारे डाग सहजासहजी जात नाहीत. हे सर्व टाळण्यासाठी यावरचा उत्तम उपचार कलिंगडाच्या बियांचे तेल रात्री चेहऱ्यावर लावू शकता. रात्री झोपण्यापूर्वी कलिंगडाचे तेल हलक्या हातांनी पिंपल्सवर लावा आणि सकाळी चेहरा थंड किंवा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

केस जर तुम्हाला पातळ आणि निर्जीव केसांना नवजीवन द्यायचे असेल तर तुम्ही यासाठी तुम्ही कलिंगडाचे तेल देखील वापरून पाहू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. खोबरेल तेलात हे तेल मिक्स करून ही तुम्ही वापरू शकता. थोडे तेल घेऊन टाळू आणि केसांच्या मुळांना मसाज करा. नंतर केसांना शॅम्पूने वॉश करा आणि त्यानंतर कंडिशनर लावा. टरबूज तेलाचा हा घरगुती उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करून पाहू शकता.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.