Weight Loss | वजन कमी करायचंय?, ओट्स खा, तंदुरुस्त रहा!

जर तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर ओट्स हा एक उत्तम पर्याय मानला जातो. वजन कमी करण्यात आपला आहार 80 टक्के भूमिका बजावतो आणि उर्वरित फक्त 20 टक्के भाग हा व्यायामाचा असतो. अशा वेळी तुम्ही फायबर युक्त अन्न खाल्लात तर तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

Weight Loss | वजन कमी करायचंय?, ओट्स खा, तंदुरुस्त रहा!
dalia

मुंबई : जर तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर ओट्स हा एक उत्तम पर्याय मानला जातो. वजन कमी करण्यात आपला आहार 80 टक्के भूमिका बजावतो आणि उर्वरित फक्त 20 टक्के भाग हा व्यायामाचा असतो. अशा वेळी तुम्ही फायबर युक्त अन्न खाल्लात तर तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. एवढेच नाही तर त्या फायबरमुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळतो. याव्यतिरिक्त तुमचा चयापचनाचा दर (metabolism rate)देखील चांगला होतो. या परिस्थितीत जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ओट्सचे सेवन करू शकता. प्रत्येक वजनदार व्यक्ती वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असते. पण अन्न काय खावे याबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. पण ओट्सच्या काही काही सोप्या पाककृती करुन तुम्ही वजनावर नियंत्रित मिळवू शकता.

1. ओटची लापशी बनविण्याची योग्य कृती

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल , तर ओटची लापशी हा एक आरोग्यदायी पर्यायांपैकी एक आहे. ही लापशी प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असते. फक्त 10 मिनिटांमध्ये आपले स्वादिष्ट जेवण तयार करू शकतो. परंतु जर लापशी बनवताना त्यात नको असणारे पदार्थ गेले तर ती आरोग्यासाठी घातक बनू शकते.

2. ओट्सचे प्रकार

तुम्हाला बाजारात तीन मुख्य प्रकारचे ओट्स मिळतात त्यामध्ये स्टील-कट ओट्स, रोल्ड ओट्स आणि इन्स्टंट ओट्स या तीन प्रकारांचा त्यात समावेश आहे. या तीन प्रकारच्या ओट्समधील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत. तिन्ही ओट्सवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केल्या जातात, या प्रक्रियांमुळे ओट्सचे पोषण पातळी बदलतात. स्टील-कट ओट्स इतर दोनपेक्षा चांगले आहेत कारण ते कमी प्रक्रिया केलेले असतात . त्यामध्ये रसायन्यांचे प्रमाणदेखील कमी असते.

3. ओट्स खाण्याचे प्रमाण

ओट्स हेल्दी असल्यामुळे याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना पाहिजे तेवढे खाऊ शकता. एकाच वेळी तुम्ही जास्त प्रमाणात ओट्स खाल्लेत तर त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

4. साखर टाळा

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि ओट्स सोबत साखर खात असाल तर त्याचा तुम्हाच्या शरिराला काहीच फायदा होणार नाही. जर तुम्ही ओट्सपासून लापशी बनवणार असाल तर त्यामध्ये साखरेच्या जागी एक चमचा मध, गूळ किंवा मॅपल सिरप वापरू शकता. ओटमीलची चव गोड करण्यासाठी नट, फळे, पीनट बटर किंवा खजूर हे पर्याय देखील तुम्ही वापरु शकता .

5. या गोष्टींपासून सावध राहा

वजन कमी करणे तुमचे लक्ष असेल तर योग्य अन्नपदार्थ निवडा. तुम्ही जेवढे पॅकेट फूड खालं त्याचा परिणाम थेट तुमच्या शरिरीवर होईल. जर तुम्ही बारीक होण्यासाठी ओट्सची मदत घेणार असालं तर त्यामध्ये फळे, शेंगदाणे, जोडताना त्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या जेणे करुन या मिश्रणारे योग्य प्रमाण तुमच्या पोटात जाईल.

इतर बातम्या :

Home Remedies For Wrinkles : डोळ्यांभोवतीची सुरकुत्यांमुळे काळजीत आहात? चिंता सोडा आणि ‘हे’ नैसर्गिक उपाय ट्राय करा!

Skin Care Tips | नितळ, सुंदर त्वचेसाठी वापरा एक चमचा कॉफी , जाणून घ्या कॉफीचे जादूई उपयोग

Kitchen Hacks : सावधान! तुम्ही आहारात वापरात असलेलं तेल शुद्ध आहे की भेसळयुक्त? अशा प्रकारे ओळखा…

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI