विमानात मिळणाऱ्या या गोष्टी कधीही खाऊ नका; एअर होस्टेसने स्वत:चं उलगडलं हे गुपित
विमानाने प्रवास करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. विमान प्रवास करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अनेकांना हे माहित नसेल की विमानात काय खावं आणि काय खाऊ नये? अन्यथा ते जेवण तुमच्या शरीरासाठी समस्या निर्माण करू शकते. चला तर मग जाणून घेऊयात की विमानात कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

विमानाने प्रवास करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. विमान प्रवास करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. किंवा विमानात प्रवास करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे देखील जाणून घेणे गरजेचे असते. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे विमानात मिळणारं जेवणं किंवा कोणतेही खाद्यपदार्थ. हे अनेकांना माहित नसेल की विमानात काय खावं आणि काय खाऊ नये. याबाबत एका अर होस्टेसने स्वत:च खुलासा केला आहे. अन्यथा ते जेवण तुमच्या शरीरासाठी समस्या निर्माण करू शकते.
विमानात मिळणाऱ्या या गोष्टी कधीही खाऊ नये
सर्वप्रथम कॉफी आणि चहा घेऊ नये
माजी फ्लाइट अटेंडंट एलेक्स क्विगलीने याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. तिच्या मते फ्लाइटमध्ये दिले जाणारे चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. कारण ते बनवण्यासाठी वापरले जाणारे पाणी फ्लाइटच्या पोर्टेबल वॉटर टँकमधून येते, जे किती वेळा स्वच्छ केले जाते हे निश्चित नसतं. तिचा सल्ला आहे की फ्लाइटमध्ये बाटलीबंद पेये निवडा.
ब्लॉटिंग टाळण्यासाठी, या गोष्टींपासून दूर रहा
फ्लाइट दरम्यान केबिन प्रेशरमध्ये बदल झाल्यामुळे गॅस आणि पोटफुगीची सामान्य समस्या निर्माण होऊ शकते. सात वर्षांपासून फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करणाऱ्या जोसेफिन रेमो म्हणतात की फ्लाइटच्या आधी आणि प्रवासादरम्यान गॅस निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळणे महत्वाचे असते. त्यांच्या नो-फ्लाय लिस्टमध्ये कांदे, बीन्स, रेड मीट, मसूर, ग्लूटेन आणि ब्रोकोली यांचा समावेश आहे. याशिवाय, कार्बोनेटेड पेये पोटात गॅस वाढवतात म्हणून त्यापासून दूर राहणे चांगले.
वास आणि नाशवंत अन्नापासून सावध रहा
माजी एअर होस्टेस जॅकलिन व्हिटमोर यांच्या मते, ट्यूना सँडविच, अंड्याचे सॅलड आणि फिश डिशेस सारखे तीव्र वास असलेले पदार्थ विमानात अजिबात आणू नयेत. बंद जागेत त्यांचा वास इतर प्रवाशांसाठी अस्वस्थ ठरू शकतो. तसेच, हे पदार्थ योग्य तापमानात साठवले नाहीत तर अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. क्रीमी डिशेस जसं की पास्ता, लसग्ना आणि मॅकरोनी पोट खराब करू शकतं
अॅलर्जीची काळजी घ्या
व्हिटमोर म्हणतात की, तुमच्या फ्लाइटमध्ये शेंगदाणे किंवा पीनट बटरसारखे अॅलर्जी निर्माण करणारे पदार्थ आणू नका. अशा पदार्थांमुळे एलर्जी ट्रिगर होऊ शकते. कारण एयरबॉर्न पार्टिकल्स संवेदनशील प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतात.
मग फ्लाईटमध्ये काय खावे?
फ्लाइटमध्ये हलके आणि पौष्टिक स्नॅक्स निवडण्याची शिफारस केली जाते. जसे की फळे, क्रॅकर्स, चीज स्टिक्स, भाज्या, मफिन्स, ग्रॅनोला बार, चॉकलेट किंवा इन्स्टंट ओट्स. तुम्ही क्रू मेमंबरची मदत घेऊ शकता. त्यांच्याकडून यासाठी तुम्ही गरमपाणी मागू शकता. स्मार्ट स्नॅकिंग हा केवळ भूक भागवण्याचा एक मार्ग नाही तर तो तुमच्या आरोग्याशी, आजूबाजूच्या हवेशी आणि सहप्रवाशांच्या आरामाशी देखील संबंधित आहे.
