होळी खेळल्यावर चेहऱ्यावरचा रंग कसा घालवायचा?

अनेकदा हे रंग इतके गडद असतात की ते काढून टाकण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागतो. आज आम्ही तुमच्यासाठी पिठाचे उटणे घेऊन आलो आहोत. या पिठाच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लागलेले गडद रंग सहज काढून टाकू शकता.

होळी खेळल्यावर चेहऱ्यावरचा रंग कसा घालवायचा?
holi celebrationImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 1:33 PM

होळी हा रंगांनी भरलेला सण आहे, त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना रंग लावतो. परंतु हे रंग अनेक प्रकारच्या हानिकारक रसायनांनी समृद्ध असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते. अनेकदा हे रंग इतके गडद असतात की ते काढून टाकण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागतो. आज आम्ही तुमच्यासाठी पिठाचे उटणे घेऊन आलो आहोत. या पिठाच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लागलेले गडद रंग सहज काढून टाकू शकता. यामुळे तुमच्या त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही, तर चला जाणून घेऊया पिठाचे उटणे कसे बनवायचे.

उटणे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • मैदा 1 टेबलस्पून
  • मुल्तानी माती 1 टेबलस्पून
  • दूध 1 टेबलस्पून
  • गुलाब पानी 1 टेबलस्पून

पिठाचे उटणे कसे बनवायचे?

  • प्रथम एका बाऊलमध्ये मैदा घ्या.
  • मग त्यात मुलतानी माती, दूध आणि गुलाबपाणी घाला.
  • यानंतर या सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा.
  • आता तुमचं पीठ तयार आहे.

उटणे कसे वापरणार ?

  • मैदा लावण्यापूर्वी चेहरा धुवून पुसून घ्यावा.
  • मग चेहऱ्यावर चांगलं लावताना थोडं स्क्रब करा.
  • यानंतर ते लावा आणि सुमारे 15 ते 20 मिनिटे ठेवा.
  • नंतर हळूहळू चेहऱ्यावरील उटणे काढून धुवून घ्या.
  • यानंतर चेहऱ्यावर कोणतेही क्रीम किंवा लोशन लावायला विसरू नका.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.