AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Family Tips : आजकालच्या पोरींना सासू-सासऱ्यांसोबत का राहायचं नसतं? ही 5 कारणं माहीत आहेत का?

साधारणपणे मुलं लग्नानंतर बायकोला घेऊन आईवडिलांसोबत राहतो. पत्नीनेही आईवडिलांची सेवा करावी अशी त्याची अपेक्षा असते. पण असंख्य मुली स्वतंत्र विचाराच्या असतात. त्यांना नोकरी आणि करिअर सांभाळायचं असतं. पण सासूसासऱ्यांना मात्र, सून घरातच राहावी असं वाटत असतं. त्यामुळे या मुली सासूसासऱ्यांपासून वेगळं राहण्याचा प्रयत्न करतात.

Family Tips : आजकालच्या पोरींना सासू-सासऱ्यांसोबत का राहायचं नसतं? ही 5 कारणं माहीत आहेत का?
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 2:28 PM
Share

आजच्या काळात कौटुंबिक गोष्टीत अनेक बदल झाला आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब असायचं. सर्व लोक एकत्रितपणे घरात गुण्यागोविंदाने राहायचे. कोणताही वाद नव्हता. सर्वांचा एकोपा होता. मात्र, काळानुसार अनेक गोष्टी बदलत गेल्या. शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि नोकरीसाठी कुटुंब पद्धती विघटन झाली. अनेक लोक नोकरीसाठी शहरात येऊ लागले. संसार थाटू लागले. त्यावेळीही लग्न झालेल्या मुली सासू-सासऱ्यांचा सांभाळ करायच्या. त्यांच्यासोबत राहायच्या. आता पिढी बदलली आणि सर्वच बदललं. आजकालच्या मुली या संयुक्त कुटुंबात राहायला मागत नाहीत. सासूसासरे त्यांना नको असतात. त्यांना वेगळं राहायला आवडतं. आजकालच्या मुली सासू सासऱ्यांसोबत का राहत नाहीत? काय आहेत त्यामागची कारणे. कोणती पाच कारणे आहेत?

स्वातंत्र्यावर गदा

सध्याचं युग हे प्रगत युग आहे. त्यामुळे मुलं असो वा मुली स्वतंत्र विचार करत असतात. त्यांची स्वत:ची ऐक जीवनशैली असते. त्यानुसार ते वागत असतात. त्यांच्या स्वत:च्या म्हणून काही भूमिका असतात. त्यांना आपल्या पसंतीने काही गोष्टी व्हाव्या असं वाटत असतं. त्यामुळेच मुलीही हल्ली मनाप्रमाणे नवरा निवडत असतात. प्रेमप्रकरण असेल तर ब्रेकअप कधी घ्यायचा हेही त्यांना माहीत असतं. लग्नानंतरही या मुलींना स्वातंत्र्य हवं असतं. त्यांना त्यांचा स्पेस हवा असतो. पण काही घरात अजूनही सासू आणि सासऱ्यांचीच मक्तेदारी घरात चालत असते. त्यामुळे या महिला वैतागतात. त्यांना लादणं हा प्रकार आवडत नाही. स्वातंत्र्य हवं असतं. एखादा निर्णय घेताना आपल्यालाही विचारात घेतलं पाहिजे असं वाटत असतं. पण सर्व काही उलट घडत असल्याने त्यांची गळचेपी होत असते.

जनरेशन गॅप

जनरेशन गॅप हा मुली सासू सासऱ्यांसोबत न राहण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सासू-सासरे जुन्या वळणाचे असतात. ते आजच्या गोष्टी समजून घेत नाहीत. नव्या गोष्टी ते अॅडजस्ट करत नाहीत. तर आजच्या मुली या जुन्या वळणाने जायला मागत नाहीत. त्यांना प्रथा परंपरा आणि घरातील नियम आवडत नाहीत. त्या बंधनात अडकायला आवडत नाहीत. त्यांचा घरातील जुन्या लोकांच्या विचारधारेशी ताळमेळ होत नाही. त्यामुळे ताण तणाव निर्माण होतो.

नवऱ्यासोबत वेळ घालवता न येणं

संयुक्त कुटुंबात मुलींना स्पेस मिळत नाही. त्यांना नवऱ्यासोबत एकांतात वेळ घालवता येत नाही. नवऱ्या भोवती घरातील मंडळीचा सतत घोळका असतो. त्यामुळे नवऱ्याशी मनातील गोष्टीही बोलता येत नाही. अडचणी सांगता येत नाही. किंवा कुठे फिरायलाही जाता येत नाही. त्यामुळे नवऱ्यासोबत वेळ घालवण्यासाठीही या मुली सासू-सासऱ्यांसोबत राहायला मागत नाहीत.

नवरा-बायकोत ढवळाढवळ

दोन अनोळखी लोक लग्नाच्या बंधनात अडकतात. त्यावेळी त्यांच्यात गोडवाही निर्माण होतो आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून खटकेही उडत असतात. जेव्हा दाम्प्त्य वेगळं राहतं तेव्हा ते एकमेकांशी संवाद साधून त्यावरून मार्ग काढतात. पण सासू-सासऱ्यांसोबत राहिल्याने त्यांची प्रायव्हेसीही कमी होते. सासू-सासरे हे मुलगा आणि सुनेच्या वादात हस्तक्षेप करतात. मुलींना या गोष्टी आवडत नाहीत. नवरा बायकोच्या वादात तिसरे लोक कशाला? अशी त्यांची भूमिका असते. पण तरीही दोघेही दाखवण्यासाठी एकत्र असल्याचा आव आणतात. पण नात्यातून पाणी बरंच वाहून गेलेलं असतं.

करिअर

आजच्या मुली करिअरबाबत फार गंभीर असतात. त्यांना नोकरी करायला आवडतं. अनेकदा तर नवरा बायको दोघे मिळून नोकरी करत असतात. दोघेही घर सांभाळत असतात. पण जेव्हा मुली सासू-सासऱ्यांसोबत राहतात तेव्हा सासू-सासरे त्यांना नोकरी सोडण्यासाठी दबाव आणतात. त्यांना नोकरी आणि करिअर करण्यात अडथळा होतात. सुनेने घर आणि मुल सांभाळावं असं त्यांना वाटतं. पण मुलींना मात्र आपलं करिअर सांभाळून सर्व करायचं असतं. परिणामी घरात खटके उडतात. त्यामुळे या तरुणी वैतागतात. त्यांचे वाद सुरू होतात.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.