AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… आणि म्हणून शॉपिंग लव्हर्ससाठी दुबई एक परफेक्ट डेस्टिनेशन!

जर तुम्ही शॉपिंगचे शौकीन असाल, तर दुबई तुमच्यासाठी एक परफेक्ट ठिकाण ठरू शकते. ज्या वस्तुंची किंमत भारतात खूप जास्त असते. इथे त्याच वस्तू तुम्ही अत्यंत किफायती दरात खरेदी करू शकता.

… आणि म्हणून शॉपिंग लव्हर्ससाठी दुबई एक परफेक्ट डेस्टिनेशन!
| Edited By: | Updated on: Apr 09, 2025 | 3:05 PM
Share

दुबईला “सिटी ऑफ गोल्ड” म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. इथे सोनं आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी लोक जगभरातून येतात. खास म्हणजे, दुबईमध्ये सोन्याच्या किमती भारताच्या तुलनेत खूप कमी असतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे दुबईमध्ये शॉपिंग पॉलिसी टॅक्स फ्री आहे आणि आयात शुल्कही खूप कमी आहे. आणि, हो, येथे ज्वेलरीच्या डिझाईन्सच्या असंख्य पर्यायांची उपलब्धता आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे सर्वोत्तम दागिने मिळतात.

इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट्सचे स्वर्ग

आता, जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सचे शौकीन असाल, तर दुबई हा एक परफेक्ट ठिकाण आहे. तुम्हाला इथे आयफोन, स्मार्टफोन, कॅमेरे, लॅपटॉप्स यांसारख्या उपकरणे खूप कमी किमतीत मिळतात. दुबईमध्ये इलेक्ट्रॉनिक्सवरील टॅक्स आणि आयात शुल्क भारताच्या तुलनेत खूप कमी आहेत, ज्यामुळे या वस्त्रांची किंमत खूप स्वस्त होते.

ब्रँडेड घड्याळं

दुबईमध्ये उच्च दर्जाची ब्रँडेड घड्याळं देखील स्वस्तात मिळतात. रॉलेक्स, ओमेगा आणि इतर लक्झरी घड्याळं इथे भारताच्या तुलनेत खूप कमी किमतीत उपलब्ध असतात. जर तुम्ही एक ब्रँडेड घड्याळ घालण्याचे स्वप्न पाहत असाल, तर दुबई तुमच्यासाठी एक परफेक्ट गंतव्य आहे.

फॅशन प्रेमींसाठी एक स्वर्ग

फॅशन प्रेमींनो,आता हे खास तुमच्यासाठी दुबईमध्ये तुम्हाला Louis Vuitton, Prada, Gucci यांसारख्या जगप्रसिद्ध ब्रँड्सचे कपडे मिळतात – आणि तेही भारताच्या तुलनेत स्वस्तात! इथे तुम्हाला प्रत्येक नवीन फॅशन ट्रेंडसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तर, आपल्या स्टाईलमध्ये एक टच अपडेट करायचा असेल, तर दुबई हा एक उत्तम ठिकाण आहे.

गाड्या आणि पेट्रोल

आता, गाड्यांची आणि पेट्रोलच्या किमतींमध्येही दुबई भारतीय बाजारपेठेच्या तुलनेत खूप स्वस्त आहे. मर्सिडीज, लँड क्रूझर, फॉर्च्यूनर यांसारख्या लक्झरी गाड्या इथे कमी किमतीत मिळतात. यासोबतच, पेट्रोलच्या किमतीही खूप स्वस्त आहेत! भारतात पेट्रोल १०० रुपये प्रति लीटर असेल, तर दुबईत ते फक्त २.८५ AED (अरबियन एमिरट्स दिरहम) प्रति लीटर आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.