मैदानात खेळाडू च्युइंग गम खाण्याचं आहे खास कारण? जाणून घ्या नेमकं काय ते

तुम्ही अनेकदा मैदानात खेळाडू खेळत असताना च्युइंग गम खाताना पाहिलं असेल. स्टाईल म्हणून खेळाडू खात असावेत असं आपल्याला वाटतं. मात्र त्यामागे वेगळंच कारण आहे.

मैदानात खेळाडू च्युइंग गम खाण्याचं आहे खास कारण? जाणून घ्या नेमकं काय ते
मैदानात खेळाडू उगाचच च्युइंग गम खात नाहीत काय? त्यामागे आहे कारण
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 3:16 PM

मुंबई : भारतात नुकतीच आयपीएल 2023 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अनेक नवे विक्रम रचले गेले. खेळाडूंचा वेगळाच अंदाज या स्पर्धेत पाहायला मिळाला. पण तुम्ही एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत केलं आहे का? काही खेळाडू भर मैदानात च्युइंग गम खाताना दिसले होते. त्यामुळे खेळाडू टाइमपास म्हणून च्युइंग गम चघळत असावेत असं काही जणांना वाटलं. पण एखाद दोन खेळाडू नाही तर बहुतांश खेळामध्ये खेळाडू मैदानात च्युइंग गम चघळताना दिसतात. काही खेळाडू नको त्या वेळी च्युइंग गम चघळताना दिसल्याने ट्रोल देखील झाले आहेत. च्युइंग गम खाणं ही काय फॅशन नसून त्यामागे खास कारण आहे. शास्त्रीय कारण वाचून कदाचित तुम्हीही आवाक् होऊन जाल. च्युइंग गम एक माउथ फ्रेशनर नसून त्यामुले आरोग्याशी निगडीत फायदेही आहेत. रिसर्चनुसार, च्युइंग गममुळे आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो.

च्युइंग गम फॅशन म्हणून चघळली जात नाही, असं शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. च्युइंग चघळत बसल्याने मन एकाग्र होतं. तसेच मेंदुला चांगल्या प्रकारे चालना मिळते. ऐन टेन्शनच्या सामन्यात पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यास मदत मिळते. च्युइंग गम खाता तेव्हा त्याची चव आपण घेत असतो. त्यामुळे चवीची ओळख करणारी रिसेप्टर आणि जबड्याचे मसल्स मेंदूला सिग्नल पाठवतात. त्यानंतर मेंदू यावर काम करण्यास सुरुवात करतो.

मेंदुला चालना मिळाल्याने बारीकसारीक गोष्टींवर लक्ष केंद्रीत होतं. तसेच फिजिकल अॅक्टिव्हिटी वाढते. त्यामुळे बॉडीमध्ये रक्तप्रवाह वेगाने होतो. हृदयाची धडधडही वाढते. त्यामुळे च्युइंग गम चघळल्याने मेंदुला पर्याप्त रक्तपुरवठा होतो.

खेळताना च्युइंग गम चघळल्याने मैदानात पूर्णपणे अलर्ट राहाता येते. तसेच तोंडाचा व्यायामही होतो. त्याचबरोबर दातात अडकलेलं अन्नक बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे दातही स्वच्छ राहतात. तोंडाच्या इतर आजारापासूनही सुटका होते.

च्युइंग गम वजन कमी करण्यास मदत करते. यामुळे भूक शमते आणि कॅलरीज कमी करण्यास मदत होते. च्युइंग गम खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होते. च्युइंग गम दिवसभरात 11 कॅलरी प्रति तास कमी करण्याची क्षमता ठेवते. त्याचबरोबर तोंडात मोठ्या प्रमाणात लाळ तयार होत असल्याने पचनशक्तीही चांगली राहते.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.