AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्रिजमध्ये का ठेवावी एक वाटी भरून मीठ? वर्षानुवर्षे फ्रिज वापरणारेही नाहीत हे जाणून! कंपनी तर सांगतही नाही ही ट्रिक

फ्रिजमधील दुर्गंधी आणि ओलावा दूर करण्यासाठी अनेकजण महागडे उपाय करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, फक्त एक छोटीशी मीठाची वाटी ठेवून हे दोन्ही प्रश्न सहज सोडवता येतात? ही जुनी पण प्रभावी ट्रिक आजही खूप कमी लोकांना माहित आहे.

फ्रिजमध्ये का ठेवावी एक वाटी भरून मीठ? वर्षानुवर्षे फ्रिज वापरणारेही नाहीत हे जाणून! कंपनी तर सांगतही नाही ही ट्रिक
फ्रीजमध्ये का ठेवतात मीठ
| Edited By: | Updated on: Jul 22, 2025 | 1:31 PM
Share

पावसाळ्याचा हंगाम आला की घरभर दमटपणा पसरतो. या दिवसांत आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही परिणाम होतो आणि त्यातील एक महत्त्वाची वस्तू म्हणजे फ्रिज. काही लोकांना फ्रिज वापरताना अनेक वर्षांचा अनुभव असतो, पण तरीही एक छोटीशी ट्रिक त्यांना माहिती नसते फ्रिजमध्ये एक छोटी वाटी भरून मीठ ठेवणं! होय, ही सवय आपला फ्रिज स्वच्छ, वासमुक्त आणि दीर्घकाळ टिकणारा ठेवू शकते.

फ्रिजमध्ये वारंवार दरवाजा उघडल्यामुळे किंवा दमट हवामानामुळे त्यात आर्द्रता (नमी) जमा होऊ लागते. ही नमी जर नियंत्रित न झाली, तर फळं-भाज्या लवकर खराब होतात आणि फ्रिजच्या आत बॅक्टेरिया तयार होतात. पण इथेच मीठ कामी येतं! मीठात नैसर्गिकरीत्या नमी शोषण्याची क्षमता असते. त्यामुळे जर तुम्ही फक्त एक छोटी वाटी (100-150 ग्रॅम) मीठ भरून फ्रिजच्या कोपऱ्यात ठेवली, तर ती नमी सहज शोषून घेते आणि फ्रिज आतून कोरडा राहतो.

याशिवाय, फ्रिजमध्ये ठेवलेल्या विविध खाद्यपदार्थांमधून विशिष्ट प्रकारच्या वासांचे मिश्रण तयार होतं जे काही काळानंतर विचित्र आणि असह्य होऊ शकतं. फळं, भाज्या, डेअरी प्रोडक्ट्स, शिजवलेलं अन्न यामधून वायू बाहेर पडतात आणि ते फ्रिजच्या आत पसरणं सुरू करतात. या गंधामुळे फ्रिजमध्ये एक अजीबसा वास भरून राहतो. पण मीठ यातूनही मार्ग काढतं कारण ते वास शोषून घेण्यास सक्षम आहे. यामुळे फ्रिजचा एकूण अनुभवच सुधारतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा फ्रिजमधील नमी आणि दुर्गंधी कमी होते, तेव्हा त्याच्या कंप्रेसरवर आणि इतर यंत्रणांवरही ताण कमी येतो. परिणामी, फ्रिजची कार्यक्षमता वाढते आणि त्याचे आयुष्यही लांबते.

कसं ठेवावं मीठ?

मीठ ठेवण्यासाठी कोणतीही फँसी डिशची गरज नाही. फक्त एक उघडी छोटी वाटी किंवा डबीत 100-150 ग्रॅम मीठ घालून फ्रिजमध्ये ठेवा. दर 15-20 दिवसांनी हे मीठ बदला, कारण नमी शोषून घेतल्यावर त्याचा प्रभाव कमी होतो. शक्य असल्यास मोट्ठं मीठ (rock salt) वापरा, ते अधिक परिणामकारक असतं.

जर तुम्हाला मीठ नकोसे वाटत असेल, तर एक पर्याय आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडाही दुर्गंधी हटवण्यासाठी खूप उपयोगी ठरतो. तोसुद्धा वाटीत घालून ठेवल्यास फ्रिजमधील वास दूर होतो.

म्हणूनच, पुढच्यावेळी फ्रिजमध्ये वास येऊ लागला किंवा दमट वाटू लागली, तर महागडे प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी फक्त एक वाटी मीठ ठेवा… आणि बघा, कसा बदल जाणवतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.