AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्रीजमध्ये 1 रुपया ठेवल्याने पैसा होणार डबल? की वेगळंच कारण? वाऱ्यासारखी का व्हायरल होत आहे ही ट्रिक

1 Rupee Coin Hack for Fridge: फ्रीजमध्ये एक रुपयांचं नाणं ठेवण्याचा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. ही ट्रिक इतकी व्हायरल का होत आहे. काय आहे त्याचा फायदा? पैसा डबल होणार की वेगळंच कारण?

फ्रीजमध्ये 1 रुपया ठेवल्याने पैसा होणार डबल? की वेगळंच कारण? वाऱ्यासारखी का व्हायरल होत आहे ही ट्रिक
| Updated on: Jun 04, 2026 | 10:14 PM
Share

1 Rupee Coin Hack for Fridge: फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवले जातात. त्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत. उन्हाळ्यात तर फ्रीज अनेकांचा जीव की प्राण असतो. शीतपेयापासून ते आईसक्रीमपर्यंतच्या पदार्थांमुळे उन्हाळा सुसह्य होतो. त्यासाठी फ्रीज मदतीला येतो. फ्रीजमधील अन्नपदार्थ ठेवले जातात आणि संध्याकाळी गरम करून खाल्ले जातात. तर काही जण तर फ्रीजमधील अन्न दोन दिवसानंतरही खातात. पण हे अन्न खराब झालंय की चांगलं आहे हे कधी कधी लक्षात येत नाही. अशावेळी एक ट्रिक तुमचं आरोग्य धोक्यात येण्यापासून वाचवते. फ्रीजमध्ये काही वस्तू ठेवल्याने पैसा डबल होत असल्याचा दावा करण्यात येतो. तर अन्नपदार्थ खराब झाले की नाही हे ओळखण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडते.

काय आहे 1 रुपयांच्या नाण्याची ही ट्रिक?

हा एक सोपा उपाय आहे. तुम्ही घरात नसताना फ्रीज किती वेळ बंद होता हे तपासण्यासाठी आणि विद्युत पुरवठा खंडीत झाला होता का हे तपासता येते. जर दिवसभर लाईट गेलेली असेल तर फ्रीजरमधील बर्फ वितळतो. अशावेळी फ्रीजमधील अन्न खराब होऊ शकते. अनेकदा घरी आल्यावर लाईट जाऊन पुन्हा आल्याचे आपल्या लक्षात येत नाही. अशावेळी चुकून खराब झालेले जेवण खावे लागते. त्यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो. 1 रुपयांचा शिक्का तुमचा हा धोका वाचवू शकतो.

कसे कराल ट्रिकचा वापर?

ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला एक ग्लास, पेला, पाणी आणि 1 रुपयांच्या शिक्क्याची गरज असेल. सर्वात अगोदर ग्लासमध्ये पाणी भरा. हा ग्लास फ्रीजरमध्ये ठेवा. जेव्हा ग्लासमधील पाणी बर्फ होईल. तेव्हा त्यावर एक रुपयांचं नाणं ठेवा. आता हा ग्लास एक रुपयांच्या शिक्क्यासह तसेच फ्रीजरमध्ये ठेवा. जेव्हा तुम्ही घरी परत येणार, तेव्हा एक रुपयाचं नाणं हे ग्लासच्या वरच आहे की नाही हे तपासा. जर नाणे वरच्या भागातच असेल तर याचा अर्थ तुम्ही घरी नसताना लाईट गेली नव्हती आणि फ्रीज सतत सुरू होता हे समोर येईल.

जर शिक्का ग्लासच्या तळाशी अथवा मध्यभागी गेला तर याचा अर्थ काही काळ लाईट गेली होती हे समोर येईल. जर ग्लासच्या तळाशी शिक्का पडला तर समजून घ्या बराच वेळ लाईट गेली होती. त्यामुळे या काळात बंद फ्रीजमधील जेवण खराब झालेले असेल. त्यामुळे ते खाणे योग्य नाही. तुमचे फ्रीज लाईट गेल्याने बराच वेळ बंद होते हे समोर होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?