AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीचे पदार्थ जास्त खाल्ल्याने पोट बिघडलंय? तर तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ उपायांचा करा अवलंब काही क्षणातच मिळेल आराम

दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण पोटभर दिवाळीचे फराळ, मिठाई खात असतो. बहुतेक घरांमध्ये विविध प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात. अशातच या पदार्थांच्या सेवनाने तुमच्या पोटात जडपणा जाणवत असेल, तर त्वरित आराम मिळवण्यासाठी तज्ञांनी सांगितलेल्या या टिप्सचा अवलंब करा.

दिवाळीचे पदार्थ जास्त खाल्ल्याने पोट बिघडलंय? तर तज्ञांनी सांगितलेल्या 'या' उपायांचा करा अवलंब काही क्षणातच मिळेल आराम
| Edited By: | Updated on: Oct 22, 2025 | 4:44 PM
Share

दिवाळी हा अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक असलेला सण आहे आणि हा सण देशभर उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी सुरू झाली की प्रत्येकजण घराच्या बाहेर रांगोळी, दिवे आणि इतर विविध सजावटींनी आपली घरे सजवतात. संध्याकाळी लक्ष्मीची देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. त्यानंतर फराळाचा आस्वाद घेतला जातो.

तसेच दिवाळी सण म्हंटल की घरोघरी फराळ बनवला जातो आणि गोड पदार्थ व मिठाई आणली जाते. अशावेळेस आपल्यापैकी अनेकजण चवीच्या मागे लागून तेलकट आणि गोड पदार्थ जास्त खातात. त्यामुळे दुसऱ्यादिवशी मात्र पोट बिघडते. तर तुमच्याही बाबतीत असे झाले तर तुम्ही आजच्या लेखात तज्ञांनी सांगितलेल्या या खास उपायांचा अवलंब करून या समस्येपासून काही क्षणातच आराम मिळवू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात.

तज्ञांनी सांगितले हे खास उपाय

दिवाळीत जास्त पदार्थांचे सेवन केल्यानंतर जर तुम्हाला तुमचे पोट जड वाटत असेल तर हे काही घरगुती उपाय आहेत जे तुमच्या शरीराला आराम देण्यास मदत करू शकतात.

जेव्हा जास्त खाल्ल्याने पोटाची समस्या सतावत असेल तर लगेच झोपू नका. थोडा वेळ वॉक करा असे केल्याने पचन सुधारते आणि पोटात गॅस तयार होत नाही.

कोमट पाण्यात लिंबू मध मिक्स करून हे पाणी प्यायल्याने विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. जर तुम्ही जास्त खाल्ले असेल तर हलके फायबरयुक्त पदार्थ जसे की सूप किंवा फळे खा.

जर तुम्हाला अ‍ॅसिडिटी आणि पोटफुगीचा त्रास होत असेल तर कोल्ड्रिंक्स, गोड पदार्थ आणि तेलकट पदार्थ सेवन करणे टाळा, कारण यामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात. गॅसची समस्या उद्भवल्यास आले किंवा ओव्याचे पाणी प्या. हे पाणी प्यायल्याने पोटफुगी आणि छातीत जळजळ यापासून देखील आराम मिळते. तुमच्या शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी दररोज पाण्याचे सेवन वाढवा.

या गोष्टी लक्षात ठेवा

तज्ञांच्यानुसार सणासुदीच्या काळात तुम्ही तुमच्या आहारात काही डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करू शकता जेणेकरून तुमचे शरीर स्वच्छ आणि हलके राहते. प्रथम, सकाळी रिकाम्या पोटी कोमट लिंबू पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि योग्य पचनक्रिया वाढवते.

कोरफडीच्या गराचा रस किंवा काकडी आणि पुदिन्याचे डिटॉक्स वॉटर देखील शरीराला थंडपणा आणि हायड्रेशन राखण्यास मदत करते.

ग्रीन टी किंवा दालचिनीचे पाणी फॅटचे चयापचय वाढवते आणि जास्त खाल्ल्यानंतर पोटफुगी कमी करते.

नारळाचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन देखील नियंत्रित ठेवते, विशेषतः जेव्हा तुम्ही जास्त मसालेदार किंवा गोड पदार्थ खाल्ले असतील. दिवसातून 1-2 वेळा हे डिटॉक्स ड्रिंक्स प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होण्यास आणि गॅस, छातीत जळजळ आणि जडपणा यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

याव्यतिरिक्त, व्यायाम आणि स्ट्रेचिंग केल्याने शरीर सक्रिय ठेवण्यासाठी आणि पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. जर तुम्हाला जास्त खाल्ल्यानंतर अस्वस्थता येत असेल, तर तुम्ही घराभोवती थोडे फेरफटका मारू शकता. जास्त खाल्ल्यानंतर लगेच झोपल्याने गॅस आणि पोट दुखण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशातच जर अस्वस्थता कायम राहिली आणि तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर कोणत्याही आरोग्य समस्या असतील तर तुमच्या आहाराकडे बारकाईने लक्ष द्या. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही घरगुती उपाय करू नका. याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!