AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलिंगडच्या सालीपासून बनवा चविष्ट पदार्थ, साल कधीच फेकू नका…

उळ्यात अनेकांना कलिंगड हे फळ खायला आवजते. कलिंगड चवीला प्रचंड गोड आणि रसाळ असते... पण कलिंगड फळाच्या सालीपासून देखील तुम्ही चविष्य पदार्थ बनवू शकता... तर जाणून घ्या कलिंगड या फळाच्या सालीचा कसा होईल उपयोग...

कलिंगडच्या सालीपासून बनवा चविष्ट पदार्थ, साल कधीच फेकू नका...
Watermelon
| Updated on: Apr 06, 2026 | 3:20 PM
Share

फळ खाल्ल्यानंतर साल आपण फेकून देतो. पण प्रत्येक फळाच्या सालीचे देखील महत्त्लव आहेत. आपण ऋतूनुसार फळ खात असतो… सध्या उन्हाळा असल्यामुळे आपण कलिंगड खातो आणि साल फेकून देतो… उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले हे फळ फक्त शरीराला थंडावा देत नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे, या उन्हाळ्यात बहुतेक लोक दररोज बाजारातून कलिंगर विकत घेतात. कलिंगड खाल्ल्यानंतर, जवळजवळ प्रत्येकजण त्याची साल निरुपयोगी समजून कचऱ्यात फेकून देतो. कलिंगड फळाच्या साली कचऱ्यात फेकू नका, त्या ऐवजी चविष्ट पदार्थ घरीच बनवा…

कलिंगडाच्या सालीपासून बनवलेले विविध पदार्थ

कलिंगड सालीचा जॅम: तुम्ही कलिंगडच्या सालीपासून सहजपणे जॅम बनवू शकता. हा जॅम ब्रेडपासून ते चपातीपर्यंत सर्व पदार्थांसोबत चांगला लागतो. कलिंगड सालीचा जॅम बनवण्यासाठी, प्रथम सालीचा हिरवा थर काढून टाका आणि नंतर उरलेल्या सालीचे लहान तुकडे करा. कापलेल्या कलिंगडच्या सालीमध्ये दोन कप साखर, लिंबाचा रस आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घाला. जेली घट्ट होईपर्यंत हे सर्व मिश्रण गरम करा. चवीसाठी तुम्ही दालचिनीसुद्धा घालू शकता.

कलिंगडच्या सालीचे लोणचे: आंबा, लिंबू, आवळा, गाजर इत्यादींपासून विविध प्रकारची लोणची बनवली जातात. त्याचप्रमाणे, कलिंगडच्या सालीपासूनही लोणचे बनवता येते. हे लोणचे बनवण्यासाठी, कलिंगडची हिरवी साल काढून टाका आणि उरलेल्या भागाचे लहान तुकडे करून ते आंब्याच्या लोणच्याप्रमाणे तयार करा. हे तुम्ही पोळी किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता.

कलिंगडच्या सालीची चटणी: तुम्ही कलिंगडच्या सालीपासून एक स्वादिष्ट चटणी बनवू शकता. ही चटणी बनवण्यासाठी, प्रथम 3 ते 4 कप कलिंगडची साल घ्या आणि सालीचा हिरवा थर काढून टाका. सालीचे लहान तुकडे करा आणि त्यात मीठ, लाल तिखट, थोडे किसलेले आले आणि तुमच्या आवडीचे मसाले घालून ते चांगले वाटून घ्या. सोप्या पद्धतीने कलिंगडच्या सालीची चटणी तयार आहे. एवढंच नाही तर, तुम्ही टरबूजाच्या सालीपासून हलवा आणि टुटी फ्रुटी बनवू शकता.

Follow Us
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला.....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन.
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात....
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय...
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय....
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री...
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री....
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA...
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA....
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने...
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने....
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या..
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प....