Mumbai South Lok sabha Result 2019: दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : यंदाही राहुल शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला. दक्ष‍िण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं होतं. इथे सुमारे 55.35 टक्के मतदानाची नोंद झाली होती. शिवसेनेकडून राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्यात यंदा लढत झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांनी …

South Central MumbaiLok sabha election result live 2019 : Mumbai South Central Rahul Shewale vs Eknath Gaikwad, Mumbai South Lok sabha Result 2019: दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : यंदाही राहुल शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला. दक्ष‍िण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं होतं. इथे सुमारे 55.35 टक्के मतदानाची नोंद झाली होती. शिवसेनेकडून राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्यात यंदा लढत झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांनी 2 वेळा खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाराहुल शेवाळे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीएकनाथ गायकवाड (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरडॉ. संजय भोसले (VBA)पराभूत

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. अणुशक्ती नगर, चेंबूर आणि माहिममध्ये शिवसेनेचा दबदबा आहे तर सायन कोळीवाड्यात भाजपचा. धारावी आणि वडाळ्यात काँग्रेसचे आमदार आहेत.

यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे, काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. संजय भोसले यांच्या लढत झाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *