AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11th Admission : 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, एमएमआरडीएसह कोणत्या जिल्ह्यात 11वी प्रवेश प्रक्रिया सुरु?

अकरावी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु केली असून MMRDA विभागासाठीच्या प्रक्रियेची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर केली आहे. वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर केलं आहे.

11th Admission : 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, एमएमआरडीएसह कोणत्या जिल्ह्यात 11वी प्रवेश प्रक्रिया सुरु?
अकरावी प्रवेशाची वेबसाईट
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 2:49 PM
Share

मुंबई : हायकोर्टाने अकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा रद्द केल्यानंतर, राज्याच्या शिक्षण विभागाने नवा निर्णय घेतला आहे. अकरावी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु केली असून MMRDA विभागासाठीच्या प्रक्रियेची माहिती  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर केली आहे. वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागासाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया असून, राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालय पातळीवर प्रवेश होतील. यानुसार 14 ते 22 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, विद्यार्थ्यांचे अर्ज, अर्जांची छाननी, दुरुस्तीची प्रक्रिया पार पडेल. (Important information of Varsha Gaikwad regarding 11th admission)

महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना आणि सर्वांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज यासंदर्भात माहिती देताना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही ट्विट केले आहे. राज्य सरकारने अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. तसेच त्यांनी यासंदर्भात संपूर्ण वेळापत्रक ट्विट केले आहे. त्यानुसार 14 ऑगस्टच्या सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुरुवात होणार आहे. विद्यार्थी स्वतःचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. नियमित प्रवेशाचा पहिला राउंड 22 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

11वी प्रवेश परीक्षा रद्द, शिक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारनं अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?

अकरावीच्या प्रवेशासाठीची साईटी परीक्षेसंदर्भात आज हायकोर्टाने निर्णय दिला आहे. अकरावी अॅडमिशन प्रोसेससाठी पुढे काय करता येईल यासाठी आम्ही अभ्यास करतो आहे. उच्च न्यायालयानं काय म्हटलं आहे ते पाहून पुढील निर्णय घेऊ, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टीव्ही 9 मराठी सोबत बोलताना सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास मान्यता रद्द करु, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा शाळांना इशारा

घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या राज्याच्या पहिल्या महिला शिक्षणमंत्री, कसा आहे वर्षा गायकवाड यांचा राजकीय प्रवास?

Important information of Varsha Gaikwad regarding 11th admission

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.