राज्यातील 2 जिल्हा परिषद, तर 6 पंचायत समितीच्या पोटनिवडणुका; या रिक्तपदांसाठी 5 जूनला मतदान

पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून रोजी मतदान होत आहे तर 6 जून रोजी मतमोजणी होणार

राज्यातील 2 जिल्हा परिषद, तर 6 पंचायत समितीच्या पोटनिवडणुका; या रिक्तपदांसाठी 5 जूनला मतदान
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील, रिक्तपदांसाठी 5 जूनला मतदानImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 7:42 PM

मुंबई: पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील (Panchayat Samiti) 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी (By election) 5 जून रोजी मतदान होत आहे तर 6 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोशेरा (मोखडा, जि. पालघर), हिसाळे (शिरपूर, जि. धुळे), हट्टी खु. (साक्री, जि. धुळे), असली (अक्राणी, जि. नंदुरबार), ब्राह्मणवाडा न- मारसुळ (मालेगाव, जि. वाशीम) आणि चणकापूर (सावनेर, जि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होणार आहे.

संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही आचारसंहिता निकाल जाहीर होईपर्यंत लागू असणार आहे.

नामनिर्देशनपत्र 17 ते 23 मे या कालावधीत दाखल

या निवडणुकीसाठीचे नामनिर्देशनपत्र 17 ते 23 मे या कालावधीत दाखल करता येणार आहे. तर निवडणूक आयोगाकडून 22 मे रोजी रविवारच्या सार्वजनिक सुट्टी दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

नामनिर्देशनपत्रांची छाननी 24 मे रोजी

नामनिर्देशनपत्रांची छाननी 24 मे रोजी होणार असून 5 जून रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. तर मतमोजणी 6 जून रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

आचारसंहितेचं पालन करा

या पोटनिवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेली आचारसंहिता ही निवडणूक काळातील जे मतदारसंघ आहेत, आणि जे उमेदवारी असणार आहेत, त्यांनी आचारसंहितेचे पालन करावे असेही कळविण्यात आले आहे.

ग्रामीण भागात मोठी चुरस

पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार असले तरी स्थानिक पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ग्रामीण भागात मोठी चुरस दिसून येणार आहे.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.