AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतल्या मेट्रोच्या 24 मालमत्ता जप्त, पालिकेची 2018 पासून नोटीस; 21 दिवसांमध्ये कर भरण्याचे महापालिकेचे निर्देश

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर दरम्यान 11.5 किलोमीटर मेट्रो चालवली जाते. सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीत उभारण्यात आलेली पहिली मेट्रो आहे. यामध्ये उद्योगपती अनिल अंबाजी यांच्या मालकीचा मोठा वाटा आहे.

मुंबईतल्या मेट्रोच्या 24 मालमत्ता जप्त,  पालिकेची 2018 पासून नोटीस; 21 दिवसांमध्ये कर भरण्याचे महापालिकेचे निर्देश
file photoImage Credit source: google
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 12, 2022 | 12:38 PM
Share

मुंबई – मेट्रोने (metro) 2013 पासून मालमत्ता कर थकवल्याने मेट्रोच्या 24 मालमत्ता मुंबई महापालिकेकडून (BMC) ताब्यात घेण्यात आल्या आहेत. इतकी वर्ष महापालिकेकडून वारंवार नोटीस देऊन सुध्दा मालमत्ता कर न भरल्याने पालिकेकडून मालमत्ता ताब्यात घेतल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे. दिलेल्या मुदतीत मालमत्ता कर न भरल्यास मुंबईतल्या मेट्रोच्या मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात येईल. तसेच त्यानंतर सुध्दा मेट्रोकडून कोणतंही पाऊल उचललं नाहीतर मलनिस्सारण वाहिनी सुध्दा बंद करण्यात येणार आहे. पालिकेकडून मेट्रोला 21 दिवसांचा कालावधी दिला असून रक्कम न भरल्यास कारवाई करण्यात येणार आहे. सध्या पालिकेने मुंबईतल्या मेट्रोच्या 24 मालमत्ता जप्त केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) यांच्यात कोणाला पैसे द्यायचे यावरून भांडणं असल्यामुळे पैसे भरले जात नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

MMRDA आणि MMOPL यांच्यात वाद

तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विपुल प्रमाणात वाटा आहे. यार्ड, कारशेड, स्टोअर बिल्डिंग, वर्कशॉप आणि इलेक्ट्रिक सबस्टेशन इत्यादी ठिकाणी महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे असे सहाय्यक महापालिका आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले. MMRDA आणि MMOPL यांच्यात मालमत्ता कोणी भरायचा यावरून वाद असल्याने मालमत्ता कर भरलेला नाही. त्याचबरोबर मालमत्तावर्सोवा-अंधेरी-घाटकोपर दरम्यान 11.5 किलोमीटर मेट्रो चालवली जाते. सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीत उभारण्यात आलेली पहिली मेट्रो आहे. यामध्ये उद्योगपती अनिल अंबाजी यांच्या मालकीचा मोठा वाटा आहे.  कर दिलेल्या मुदतीत न भरल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. मुंबईत सध्या सुरू असलेल्या मेट्रोचा प्रकल्प सार्वजनिक असल्याने या प्रकल्पाला मालकत्ता कर भरण्यापासून सुट देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत असे मेट्रोच्या म्हणणे आहे.

या आठ स्थानकांचा समावेश आहे

मरोळ नाका मेट्रो स्थानक (Marol Naka Metro Station) एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक (Airport Road Metro Station) जे. बी. नगर मेट्रो स्थानक (JB Nagar Metro Station) पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक (Western Express Highway Metro Station) पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक (Western Express Highway Metro Station) डी. एन. नगर मेट्रो स्थानक (D N Nagar Metro Station) वर्सोवा मेट्रो स्थानक (Versova Metro Station) एलआयसी अंधेरी मेट्रो स्थानक (LIC Andheri Metro Station)

अवकाळाचे थैमान सुरुच राहणार, आता विदर्भ-मराठवाड्याला धोका, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

tv9 Explainer: उत्तर प्रदेशात ज्यांची ‘पंकजा मुंडे’ सारखी अवस्था केल्याची चर्चा आहे, त्या उपमुख्यमंत्री मौर्यची जागा कोण घेणार?

The Kashmir Files: प्रभासला ‘द काश्मीर फाइल्स’ची जोरदार टक्कर; निवडक शो असूनही चांगली कमाई

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी