राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 40 हजार पास वाटप, तर 5 लाख 92 हजार नागरिक क्वारंटाईन

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4,40,696 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले (Home Minister Anil Deshmukh) आहेत.

राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 40 हजार पास वाटप, तर 5 लाख 92 हजार नागरिक क्वारंटाईन

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4,40,696 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले (Home Minister Anil Deshmukh) आहेत. तसेच 5,92,580 व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे (Home Minister Anil Deshmukh).

राज्यात लॉकडाऊनच्या दरम्यान म्हणजे 22 मार्च ते 31 मे या कालावधीत कलम 188 नुसार 1,21,075 गुन्हे नोंद झाले असून 23,641 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 6 कोटी 11 लाख 93 हजार 848 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 257 घटना घडल्या. त्यात 835 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

100 नंबरवर 98 हजार फोन

पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 98,642 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा 706 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 5,92,580 व्यक्ती Quarantine आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1323 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि 76,883 वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | राज्यात 2,361 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार

केंद्राच्या दहा तुकड्या राज्यात दाखल, प्रत्येक तुकडीत 100 पोलीस : अनिल देशमुख

केंद्राच्या दहा तुकड्या राज्यात दाखल, प्रत्येक तुकडीत 100 पोलीस : अनिल देशमुख

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *