AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon blast case verdict : सर्व आरोपी निर्दोष सुटताच जमात-ए-उलेमाचा कासिम म्हणाला, आम्ही…

Malegaon blast case verdict : आज 17 वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाला आला आहे. सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. पण त्यांची निर्दोष सुटका झाली. त्यावर जमात-ए-उलेमाचा जिल्हाध्यक्ष कासिम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Malegaon blast case verdict :  सर्व आरोपी निर्दोष सुटताच जमात-ए-उलेमाचा कासिम म्हणाला, आम्ही...
jamiat e ulema kasim-pragya singh thakur
| Updated on: Jul 31, 2025 | 12:26 PM
Share

मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आज लागला. संपूर्ण देशाच लक्ष या निकालाकडे लागलं होतं. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयए कोर्टाने हा निकाल दिला. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. पण आज विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

“आज जो निकाल आला, तो डोळ्यात धूळफेक करणारा निर्णय आहे. एवढा मोठा स्फोट झाला. 6 लोक शहीद झाले, 100 लोक जखमी झाले. लोकांना मोठा धक्का बसला. हेमंत करकरे साहेबांनी एवढी मेहनत करुन या लोकांना अटक केली. पुरावे गोळा केले. एवढ सर्व असताना या आरोपींची सुटका झाली, हे समजण्यापलीकडे आहे. हे गुन्हेगार नसतील तर सरकार 17 वर्ष झोपलं होतं का?. आरोपींना का अटक केली नाही?. आम्ही न्याय मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार. न्याय मिळावा अशी आमची भावना आहे” असं जमात-ए-उलेमाचे जिल्हाध्यक्ष कासिम म्हणाले.

7 जणांवर याप्रकरणी आरोप

न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, यांच्यासह 7 जणांवर याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बसफोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याबद्दल काय म्हटलं?

साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावाने असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट अढळला न्हवता. नंबरप्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असतो. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या दोन वर्ष आधी साध्वी प्रज्ञा सन्यासी बनल्या. भौतिक संपत्तीपासून त्या लांब होत्या असं कोर्टाने म्हटलय. मालेगावमध्ये स्फोट झाला हे फिर्यादी पक्षाने सिद्ध केलं. पण घटनास्थळी सापडलेल्या मोटरसायकलवरच तो बॉम्ब ठेवलेला होता हे सिद्ध करता आलं नाही असं कोर्टाने म्हटलय.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.