AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, तब्बल इतक्या नगरसेवकांचे पद धोक्यात, थेट कोर्टात..

शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची पदे धोक्यात आली आहेत. ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या तब्बल 9 नगरसेवकांची पद धोक्यात आहेत. याबाबत थेट कोर्टात धाव घेण्यात आली. ज्याने एकच खळबळ उडालीये.

शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, तब्बल इतक्या नगरसेवकांचे पद धोक्यात, थेट कोर्टात..
Eknath Shinde Shiv Sena
| Updated on: May 12, 2026 | 8:08 AM
Share

शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची पदे धोक्यात आली आहेत. ज्याने एकच मोठी खळबळ उडालीये. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या काही नगरसेवकांविरोधात निवडणूक शपथपत्रात कथितरित्या चुकीची, अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी न्यायालयात इलेक्शन रिट पिटीशन दाखल करण्यात आली. ज्याने या नगरसेवकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. याबाबत ॲड. रोहिदास मुंडे यांनी ही माहिती दिली. संबंधित नगरसेवकांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, बांधकामे, आर्थिक माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे व मालमत्ता लपविल्याचाही मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांनुसार निवडणूक शपथपत्रात चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण मानले जाते. जनप्रतिनिधींनी मतदारांपासून तथ्य लपविल्यास संबंधित निवडणूक रद्द होण्यासह लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील तरतुदींनुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे ॲड. रोहिदास मुंडे यांनी स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 33A, कलम 36 तसेच भारतीय न्यायव्यवस्थेने वेळोवेळी दिलेल्या आदेशांनुसार उमेदवाराने सत्य व संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. खोटी माहिती सादर करणे किंवा तथ्य लपविणे हे मतदारांची दिशाभूल करणारे कृत्य मानले जाते. या प्रकरणात रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, साक्षी मढवी, दर्शना म्हात्रे, अर्चना पाटील, दिपाली भगत आणि स्नेहा पाटील या नगरसेवकांविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली.

सदर बाब न्यायालयाच्या विचाराधीन असून संबंधित उमेदवारांविरोधात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमध्ये शपथपत्रातील माहितीबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांचे पद थेट धोक्यात आली आहेत. तब्बल 9 नगरसेवकांची पदे धोक्यात आहेत. यावर आता शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, याने एकच खळबळ उडालीये.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?