Sangli snake kiss contro : नागाचं चुंबन सर्पमित्राला महागात, वाळवा तालुक्यातल्या तरुणावर गुन्हा दाखल; पाहा Video

Sangli snake kiss contro : नागाचं चुंबन सर्पमित्राला महागात, वाळवा तालुक्यातल्या तरुणावर गुन्हा दाखल; पाहा Video
नागाचं चुंबन घेतल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला सर्पमित्र प्रदीप अशोक अडसुळे
Image Credit source: Tv9

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील प्रदीप अशोक अडसुळे याने नागाचा चुंबन घेऊन सोशल मीडियावर (Social media) व्हिडिओ व्हायरल केले. या सर्पमित्र तरुणावर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद (Case registered) करण्यात आला आहे.

प्रदीप गरड

|

Mar 29, 2022 | 3:32 PM

सांगली : जीवघेणा स्टंट (Stunt) करत नागाचा चुंबन घेणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील प्रदीप अशोक अडसुळे याने नागाचा चुंबन घेऊन सोशल मीडियावर (Social media) व्हिडिओ व्हायरल केले. या सर्पमित्र तरुणावर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद (Case registered) करण्यात आला आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील मौजे बावची येथील प्रदीप अशोक अडसुळे हा सर्पमित्र नाग आणि साप पकडत होता. तर त्याचे चुंबन घेण्याचे जीवघेणा स्टंट तो करत होता आणि सोबत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करत होता. या तरुणावर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नाग पकडून त्याच्यासोबत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

sarpamitra

नागाचं चुंबन घेतल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला सर्पमित्र प्रदीप अशोक अडसुळे

वनविभागाने केली कारवाई

बावची येथील प्रदीप अशोक अडसुळे याने नाग पकडून त्याच्यासोबत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला. याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई विजय माने उपवनसंरक्षक सांगली, डॉ. अजित साजने सहाय्यक वनसंरक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव वनक्षेत्रपाल शिराळा, सुरेश चरापले वनपाल इस्लामपूर व अमोल साठे वनरक्षक बावची व निवास उगले व भगवान गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

‘जीवघेणे स्टंट कोणीही करू नये’

अशाप्रकारे जीवघेणे स्टंट कोणीही करू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. नागाला अथवा सापाला इजा पोहोचेल असे कृत्य केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही वन विभागाने म्हटले.

काय आहे प्रकरण?

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मौजे बावची येथील प्रदीप अशोक अडसुळे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रदीपने नाग पकडून त्याच्यासोबत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला होता.

आणखी वाचा :

शिवथाळीची ऐशी-तैशी..! चक्क शौचालयात धुतली जात आहेत भांडी, संतापजनक Video viral

एक-दोन नाही 50-60 गाड्या एकमेकांना आदळल्या, तिघांचा मृत्यू; पाहा, पेनसिल्व्हेनियामधल्या वादळाचा Shocking Video

Video : जगातला सर्वात महागडा उंट, किंमत माहीत आहे का? सौदी अरेबियात नुकताच झालाय लिलाव; वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें