मामा कामाला जायचा… मामीचा खेळ सुरू व्हायचा, बेडरूममध्ये बोलावून… काय घडायचं?
छत्रपती संभाजीनगरमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मामीला अटक करण्यात आली आहे. आईच्या निधनानंतर भाचा मामाकडे राहायला गेला होता. त्यानंतर काही दिवसांमध्ये असे काही झाले की सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कौटुंबिक नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संवेदनशील प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाणे संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. अल्पवयीन भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली मामीच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी फेटाळून लावला आहे. या प्रकरणातील धक्कादायक तपशील समोर आल्यानंतर अनेकजण सुन्न झाले आहेत. पोलिसांच्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पीडित मुलाच्या आईचे निधन झाल्यानंतर तो शिक्षणासाठी आपल्या मामाच्या घरी राहू लागला होता. मात्र, तेथे त्याची स्थिती अत्यंत क्लेशदायक बनली. तक्रारीनुसार, मार्च २०२३ मध्ये आरोपी महिलेने (मामी) पीडित मुलाला बेडरूममध्ये बोलावून घेतले आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिने मुलाला सतत धमकावले की, कोणाला हे सांगितलंस तर खोट्या गुन्ह्यात अडकवीन. मामी मुलाला सतत ब्लॅकमेल करत राहिली.
मामाने रंगेहात पकडलं
मामीने मुलाला अचानक, नकळत मिठी मारणे, नको त्या ठिकाणी स्पर्श करणे असे प्रकार सुरू केले होते. मामा घराबाहेर गेल्यावरच ती असे कृत्य करत असे. विरोध केल्यास घरातून काढून टाकण्याची धमकी ती मुलाला देत होती. नंतर तिने थेट शारीरिक संबंधाची मागणी केली आणि मुलाला भाग पाडले.
सप्टेंबर २०२३ मध्ये मामाने आपल्या पत्नी आणि भाच्याला रंगेहाथ पकडल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यानंतर पीडित मुलगा ताबडतोब आपल्या वडिलांकडे परत गेला. नंतरच्या माहितीनुसार, आरोपी महिला जुलै २०२४ मध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याचे समोर आले आहे.
चिकलठाणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी तपास पूर्ण करून २० नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. न्यायालयाने आरोपी महिलेचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारत तिच्याविरुद्ध कठोर कारवाईचे मार्ग मोकळे केले आहेत. हे प्रकरणाने अनेकांना धक्का बसला आहे.
