AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला; तासभर चर्चा , पण जरांगे पाटील ‘वर्षा’वरील आंदोलनावर ठाम

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. ते 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत, या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे.

अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला; तासभर चर्चा , पण जरांगे पाटील 'वर्षा'वरील आंदोलनावर ठाम
manoj jarange patiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 22, 2026 | 12:56 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे, ते येत्या 29 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी येत्या 29 ऑगस्टपासून आंदोलनाची हाक दिली आहे, या आंदोलनात समाजाने मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहान देखील त्यांनी केलं आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता सरकार दरबारी हालचालीला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये तब्बल एक तासांपेक्षा अधिक चर्चा झाली.

29 ऑगस्टपासून मनोज जरांगेंकडून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. सरकार तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे, त्यामुळे उपोषण टाळा अशी विनंती यावेळी सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही तुमच्या विरोधात नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुमच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, असंही यावेळी सत्तार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावर बोलताना  सरकारने समाजाचं वाटोळं केलं, आता उपोषण करणारच असं सत्तार यांना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. समाजाशी दगा करून आपण कधीच जगू शकत नाही, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.  आम्ही मुंबईत येणार, आम्ही म्हणतो फडणवीस साहेब आमचे, मग तुम्हाला आम्हाला वर्षा बंगल्यावर बसू द्यायला काय हरकत आहे? आम्ही खोलीत बसत नाहीत, बंगल्यावर बसू , आम्ही वर्षावर आंदोलन करण्यावर ठाम आहोत. अस यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा 

दरम्यान आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा देखील केला. त्यांनी आपल्या या दौऱ्यामध्ये मराठा बांधवांच्या गाठी -भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता.

Follow Us
राहुल गांधींच्या कार्यक्रमात परदेशी फंडिंग... बड्या नेत्याचं विधान
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमात 9 ते 10 कोटी रुपये... बड्या नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ
पुण्यात मध्यरात्री राडा, त्या मुलीचा व्हिडीओ आला समोर, माफीचं सत्य...
COEP कॉलेज : पुण्यात मध्यरात्री राडा, त्या मुलीचा व्हिडीओ आला समोर, माफीचं सत्य काय?
आमदार अपात्रतेबाबत मी... शिवसेना सुनावणीवर विधानसभा अध्यक्षांचं विधान
आमदार अपात्रतेबाबत मी... शिवसेना सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
पुण्यात रहुल गांधी येण्याआधीच दोन विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा राडा,
पुण्यात रहुल गांधी येण्याआधीच दोन विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा राडा, चक्क बुटाने...
शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... राहुल गांधींच्या मोहिमेची तयारी
Rahul Gandhi | शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... पुण्यात राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज' मोहिमेची समर्थकांकडून जय्यत तयारी
भाजपच्या पायाखालील वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड...
भाजपच्या पायाखालीची वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड... संजय राऊतांचं अजब भाकित
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश,
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश, नितेश राणेंनी दिला धक्का
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक रद्द
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक  रद्द, पदावर टांगती तलवार
धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
Omraje Nimbalkar : धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?