AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली पोलिसांच्या स्पष्टीकरणावर दिपकेंची पहिली प्रतिक्रिया, आजीच्या निधनानंतर पोलिसांनी माहिती दिली का? अभिजीतनं काय सांगितलं?

दिल्ली पोलिसांच्या स्पष्टीकरणावर अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी दिल्ली पोलिसांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप दिपकेंनी केला. त्यांनी हिंगोलीतून दिल्ली पोलिसांवर आरोप केला.

दिल्ली पोलिसांच्या स्पष्टीकरणावर दिपकेंची पहिली प्रतिक्रिया, आजीच्या निधनानंतर पोलिसांनी माहिती दिली का? अभिजीतनं काय सांगितलं?
abhijeet dipkeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 12, 2026 | 10:46 AM
Share

दिल्लीत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलनाची हाक देणारे अभिजीत दिपके हे आजीच्या निधनानंतर हिंगोलीत गावी पोहोचले आहेत. पोलिसांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर रात्री उशिरा अभिजीत दिपके घरी पोहोचले. घरी उशिरा पोहोचलेल्या दिपकेंनी कुटुंबाची विचारपूस केली. त्यानंतर आज सकाळी अभिजीत दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या स्पष्टीकरणावर प्रतिक्रिया दिली. माझ्या वकिलाशी देखील बोलू दिल नाही. मानसिक त्रास देण्यात आला, असा आरोप अभिजीत दिपकेंनी केला.

अभिजीत दिपकेंनी माध्यमांशी संवाद साधला. दिपके म्हणाले, ‘मला हमीपत्रावर सही करण्यास सांगत होते. हमीपत्रात आंदोलन करून शांतता भंग करत असल्याचा आरोप माझ्यावर केला. मला आंदोलनच करून दिलं नाही. मला विमानातून उचललं. मी सही करणार नाही. मला अडकवू शकत नाही. मी शिकलेला आहे. माझे वकील येत नाही,तोपर्यंत कशावर सही करणार नाही’.

‘आम्ही लवकरच पुन्हा रस्त्यावर उतरू. जोपर्यंत नरेंद्र मोदींच्या हुकूमशाहीचा अंत होत नाही. तोपर्यंत आंदोलन करत राहणार. तुम्हाला अटक करण्यासाठी महिला पोलिसांना का पाठवलं, असा प्रश्न विचारल्यावर दिपके म्हणाले, या गोष्टी दिल्ली पोलीस सांगू शकतात. पुरुष पोलिसांनी जो छळ केला आहे, त्याची दिल्ली पोलिसांना लाज वाटली असेल. त्यामुळे पुढे केलं असेल. स्वत:च्या बचावासाठी पुढे केलं असेल. दुसरी बाब म्हणजे अटक करताना माझ्या हातून काही झालं, तर दिल्ली पोलीस आरोप करायला पुढे असते. त्यासाठी महिला पोलिसांना पुढे केलं असेल. परंतु आम्हाला महिलांचा सन्मान करतो. आम्ही गुंड नाहीत, असे दिपके पुढे म्हणाले.

‘मी माझा मोबाईल पोलिसांकडे मागत होतो. माझ्या वकिलाशी बोलण्याविषयी बोलत होतो. तो व्हिडिओ का रिलीज करत नाही. हिमंत असेल, तर पूर्ण व्हिडिओ दाखवा. मला मुलभूत अधिकार नाकारले.  वकिलांशी बोलण्याचा कायदेशीर अधिकार असतो. आता नैतिक आधार घेत आहेत. आजीचं निधन झाल्याने आम्ही त्याला सांगितले पोलीस बोलत आहे.  रात्रीच्या साडेतीन वाजता अटकेचं पेपर घेऊन का आले. एवढ्या रात्री दीर्घकाळासाठी तुरूंगात जाणार आहे, त्यासाठी सही करायला सांगितले. मी त्यावेळी वकिलांशी फोन करण्यासाठी विचारले. त्यांनी आई-वडिलांना सांगण्यास सांगितलं. मी रात्री साडेतीन वाजता कुटुंबीयांना कॉल का करू. दिवसभर कोणत्या पोलीस स्टेशनला ठेवलं, याची माहिती दिली नाही. रात्री आई-वडिलांना फोन करून टेन्शन देऊ, असा सवाल केला. खरंतर दिल्ली पोलीस मानसिक त्रास देत होती. माझ्यासहित कुटुंबाचा देखील मानसिक त्रास देत होते, असा आरोप दिपकेंनी केला.  तसेच दिल्ली पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. दिल्ली पोलीस व्हिडिओ एडीट करून दाखवत आहे, असा आरोप दिपकेंनी केला.

Follow Us
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!