तांबेच्या भूमिकेवर नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं, नाना पटोले यांनी थोरातचं नाव न घेता तांबे यांच्या घरातील वादच काढला

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 3:38 PM

तुमची विचार सरणी स्वतः पुरती की पक्षासाठी हे सिद्ध झालंय त्यामुळे यावर मला चर्चा करायची नाही, आदेशाचे पालन आता पण कोणी करत नसेल तर त्यांना तातडीने जागा दाखवली जाईल असा इशारा इतर पदाधिकाऱ्यांना पटोले यांनी दिला आहे.

तांबेच्या भूमिकेवर नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं, नाना पटोले यांनी थोरातचं नाव न घेता तांबे यांच्या घरातील वादच काढला
Image Credit source: Google

नाशिक : महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नाशिक दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी सत्यजित तांबे यांच्यासह सुधीर तांबे यांच्यावर हल्लाबोल करत एबी फॉर्म देऊनही कॉंग्रेसची उमेदवारी का नाकारली असा सवाल उपस्थित केला असून त्यावर तांबे का बोलत नाही असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्रात मविआ म्हणून काम सुरू आहे. भाजपच्या विरोधातला आमचा जाहीर समझोता आहे. ही आमची काँग्रेसची जागा होती, त्या बदल्यात आम्ही नागपूरची जागा त्यांना दिली, नाशिकला दोन कोरे एबी फॉर्म पाठवले होते, अस असताना अशी धोखाधडी होईल असं आम्हाला पण वाटलं नव्हतं, म्हणून आम्ही मविआ म्हणून सेनेला पाठिंबा दिलाय. राष्ट्रीय अध्यक्षांनी पाठवलेल्या एबी फॉर्म ला तुम्ही कचऱ्याच्या पेटीत टाकलं त्याच उत्तर का देत नाही त्यामुळे मला त्यात जास्त जाऊ देऊ नका असा माझा त्यांनाही तुमच्या माध्यमातून सल्ला आहे मी खोलात गेलो तर फार अडचण होईल असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

तुमची विचार सरणी स्वतः पुरती की पक्षासाठी हे सिद्ध झालंय त्यामुळे यावर मला चर्चा करायची नाही, आदेशाचे पालन आता पण कोणी करत नसेल तर त्यांना तातडीने जागा दाखवली जाईल असा इशारा इतर पदाधिकाऱ्यांना पटोले यांनी दिला आहे.

मी इथे कोणाची मनधरणी करायला आलो नाही, सत्यजितच्या उमेदवारीला विरोध असता तर मी कोरा फॉर्म नसता पाठवला, आम्ही जेव्हा सुधीर तांबेच्या नावाची घोषणा केली तेव्हाही सत्यजित बाबत सांगता आलं असतं असं नाना पटोले यांनी म्हंटलं आहे.

डॉ. तांबे यांच्याशी बोलणं झालं तेव्हा तरी त्यांनी सांगायला हवं होतं, मग असे खोटे आरोप कशाला करता ? आम्ही प्रामाणिक असताना अप्रामाणिक लोकांनी आमच्यावर आरोप करण चांगलं नाही.

देशातली आणि जगातली सर्वात मोठी पार्टी म्हणवणाऱ्या भाजपला नाशिकमध्ये उमेदवार का नाही ? आम्ही जेव्हा तांबे यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हा भाजपने उमेदवार का दिला नाही

भाजपच असं कोणतं नाक कटल आहे ? शूर्पणखेचे नाक कुठे कटल ? असा भाजपला टोला लावत दुसऱ्यांची घर फोडायला आज त्यांना आवडतंय, ज्या दिवशी यांचं घर फुटेल तेव्हा भाजपला समजेल असेही पटोले यांनी म्हंटलं आहे.

हे सुद्धा वाचा

आमच्यासाठी तांबेचा विषय क्लोझ झाला आहे, एकदा पुढे गेलो, आता वापस यायचं काम नाही, वडिलांना तिकीट मिळालं तर पोराने बंडखोरी केली, पोराचा फॉर्म भरायला कोण गेलं ? मग हा घरातला वाद ना ! घरातला वाद काँग्रेसवर का लादता तुम्ही असाही घणाघात पटोले यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI