AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंगी गुडियावरून कार्यकर्ते प्रचंड संतापले, चप्पल मारो आंदोलन… नाशिकमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने, उडाला मोठा गोंधळ

Nashik NCP-Congress Protest: गुंगी गुडियाचा वाद अजूनही संपलेला नाही. काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तर त्याचवेळी काँग्रेस कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने नाशकात मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी चप्पल मारो आंदोलन झाले. काय घडलं?

गुंगी गुडियावरून कार्यकर्ते प्रचंड संतापले, चप्पल मारो आंदोलन... नाशिकमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने, उडाला मोठा गोंधळ
नाशिक राष्ट्रवादी, काँग्रेस
| Edited By: | Updated on: Aug 05, 2026 | 11:27 AM
Share

मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाकडे चाल करून आले. त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तर त्याचवेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरल्याने मोठी चकमक घडण्याची शक्यता निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. तरीही दोन्ही बाजूंनी घोषणा सुरू होत्या. नाशकात मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी राष्ट्रवादीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला चप्पल मारो आंदोलन केले.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्याचे पडसाद नाशकातही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसविरोधात जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस, हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात घोषणा दिल्या. काँग्रेस कार्यालयाकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले. तर दुसरीकडून काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरले. दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू होती. यावेळी एकच गोंधळ उडाला.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसविरोधात आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या ‘गुंगी गुडिया’ वक्तव्याविरोधात आज नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक दिसली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार निदर्शने करण्यात आली. आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांची आंदोलनात उपस्थिती होती. मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आंदोलनादरम्यान काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नागपुरात राष्ट्रवादी अजितदादा गटाचं निषेध आंदोलन

काँग्रेसने गुंगी गुडीया म्हणून केलेल्या टीकेच्या निषेधार्थ नागपूरमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाने आंदोलन केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, प्रवक्ते प्रशांत पवार, श्रीकांत शिवनकर, तानाजी वनवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. नागपूरातील व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. राज्यातील विविध शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसविरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. बीडमधील पत्रकार परिषदेत, कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेविरोधात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगले. तर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली होती. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली. त्यानंतर राज्यात दोन्ही पक्षात वाद उफाळला.

Follow Us
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?