Raj Thackeray : बेस्टचा निवडणूक निकाल, फडणवीसांची भेट…राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
Raj Thackeray : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढवणार अशी शक्यता आहे. त्याआधी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यामुळे छोटी लिटमस टेस्ट म्हणून या निवडणूक निकालाकडे सगळे पाहत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले. सकाळी 9 च्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. ही बातमी समोर येताच विविध अंदाज, तर्क-वितर्क सुरु झाले. कालच बेस्टच्या पतपेढीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीकडे राजकीय जाणकारांच लक्ष लागलं होतं. कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवलेली. सध्या मनसे आणि उद्धव ठाकरे गटाची युती होणार अशी चर्चा आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढवणार अशी शक्यता आहे. त्याआधी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यामुळे छोटी लिटमस टेस्ट म्हणून या निवडणूक निकालाकडे सगळे पाहत होते.
प्रत्यक्षात निकाल आला, तो दोन्ही ठाकरे बंधुंसाठी मोठा झटका आहे. कारण त्यांना बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. त्या ऐवजी शशांक राव यांच्या युनियनला 14 आणि भाजपच्या पॅनलला 7 जागा मिळाल्या. ठाकरे बंधु एकत्र येऊनही काही फायदा होत नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. तेच आज निकालाच्या दुसऱ्यादिवशी राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या.
भेटीच कारण स्पष्ट केलं
मनसे उद्धव ठाकरे गटासोबत युती करणार नाही का? मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? असे विविध अंदाज सुरु होते. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीनंतर शिवतीर्थवर येऊन राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपण का भेटलो ? त्यामागच कारण स्पष्ट केलं.
त्यामुळे सांगणं गरजेचं
“मला टाऊन प्लानिंगच्या विषयाची आवड आहे. मागत्या काही महिन्यात मी एक ते दोनवेळा मुख्यमंत्र्यांना भेटलो. साधारणपणे त्याचा आराखडा कसा करता येईल यावर चर्चा होती. 2014 मध्ये अस्थेटिक या विषयावर मी 16 मिनिटांची डॉक्युमेंट्री केली होती. ती इतर भाषेतही करत आहे. टाऊन प्लानिंग आणि इतर गोष्टी आवडीचे विषय आहेत. मी जे सांगतो त्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही. त्यामुळे सांगणं गरजेचं आहे. नाही तर लोकांची मते घेत बसाल” असं राज ठाकरे म्हणाले. मुंबईत सध्या पार्किंगचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. लोक रस्त्यावर कुठेही कार, दुचाकी पार्क करतात. या पार्किंगच्या मुद्यावर मार्ग काढण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले.
