Parth Pawar Land Scam : ‘अजितदादा दरोडेखोर, त्यांचे दोन दिवटे म्हणजे…’, संधी मिळताच या नेत्याने अजितदादांबद्दल वापरले नको ते शब्द
Parth Pawar Land Scam : "पवार कुटुंब हे ब्रिटिश इंडिया ईस्ट कंपनी आहे. अजित दादा पवार हा पोल्ट्री वाला माणूस आहे" असे म्हणताना त्यांची जीभ घसरली. "मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार. कुणाचा डीएनए ओबीसी आहे, हे तिकीट वाटपानंतर कळेल"

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात नाव आल्यानंतर चहूबाजूंनी टीका सुरु झाली आहे. अजितदादा यांचे विरोधक तुटून पडले आहेत. व्यक्तिगत पातळीवरची अत्यंत बोचरी टीका सुरु आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 1800 कोटीची जागा पार्थ पवार यांच्या कंपनीला 300 कोटी रुपयात दिल्याचा आरोप आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर टीका करताना जिव्हारी लागणारे शब्द वापरले. “उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांचे दोन “दिवटे” एक दारूचा कारखाना चालवतो आणि एक जमिनीचा घोटाळा करतो” असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. “अजित दादा पवार हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे दरोडेखोर आहेत. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा काल झालेल्या अमेडिया कंपनीच्या जमीन प्रकरणी राजीनामा द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु” असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.
“अमिद या कंपनीची स्थापना अजित पवार यांच्या शिवाजीनगर येथील घरात झाली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांचे हे दिव्य कर्तृत्व बघून त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. हजारो कोटी रुपयाचे भूखंड, हजारो कोटींची माया जमवणारे हे पवार कुटुंब आहे. भाजपाचे भांडवलच पवार कुटुंब आहे. त्यामुळेच भाजपने त्यांना जवळ केलेलं आहे, असा आरोप केला. इथून पुढच्या काळात भाजपा बे दखल होईल अशी भीती व्यक्त करत कालची घटना म्हणजे हिमनगाचे टोक आहे” अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
असे अजित पवार कोण आहेत?
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. धनंजय मुंडे यांना एक न्याय आणि अजित पवारांना एक न्याय असे अजित पवार कोण आहेत?” असा सवाल देखील लक्ष्मण हाके यांनी केला. “मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट कोणी केला असेल तर हे गंभीर आहे. आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. मनोज जरांगे यांना कोणतीही जखम होता कामा नये, मनोज जरांगे पाटील चांगल्या पद्धतीने फिरला पाहिजे,वागला पाहिजे, जगला पाहिजे” अशी टिप्पणी लक्ष्मण हाके यांनी केली.
